Home तळोदा अजित पवार राष्ट्रवादी गट पक्षाच्या तालुकाध्यक्षपदी डॉ.पुंडलिक राजपूत यांची निवड

अजित पवार राष्ट्रवादी गट पक्षाच्या तालुकाध्यक्षपदी डॉ.पुंडलिक राजपूत यांची निवड

34
Ajit Pawar NCP Party Group Program
Ajit Pawar NCP Party Group Program

(तळोदा) अजित पवार राष्ट्रवादी गटाचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तळोदा तालुकाध्यक्ष म्हणून डॉ.पुंडलिक गोविंद राजपूत यांची निवड झाली आहे.

पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांच्या हस्ते डॉ.पुंडलिक राजपूत यांना नियुक्तीपत्र

अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या सूचनेनुसार नंदुरबार येथील पक्षाच्या कार्यक्रमात महाराष्ट्र शासनाचे पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अभिजीत मोरे यांच्या सहीचे नियुक्तीपत्र डॉ. पुंडलिक गोविंद राजपूत यांना नुकतेच दिले. आणि त्यांना तळोदा तालुका अजित पवार गटाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष म्हणून याच कार्यक्रमात घोषित करण्यात आले. पक्षाची ध्येय धोरणे तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी, पक्ष वाढीसाठी तसेच पक्षाच्या आदेशांचे तंतोतंत पालन करण्यासाठी ही नियुक्ती झाली असल्याचे सांगण्यात येत आहे.

अजित पवार राष्ट्रवादी गट नेमका काय आहे ?

अजित पवार यांनी त्यांचे काका शरद पवार यांची साथ सोडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळात उपमुख्यमंत्रिपदाची नुकतीच शपथ घेतली, यामुळे राष्ट्रवादीमध्ये अभूतपूर्व फूट पडली. तसेच अजित पवार यांनी राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदावर देखील हक्क सांगितला. पक्षाचे नाव आणि निवडणूक चिन्ह स्वतःकडे ठेवण्याची इच्छा व्यक्त केली आणि विद्यमान अध्यक्ष शरद पवार यांच्यापासून राष्ट्रवादी पक्ष स्वतःकडे घेण्याचे संकेत दिले. तेव्हापासुन अजित पवार राष्ट्रवादी गट सातत्याने महाराष्ट्रातील लोकांमध्ये जाऊन विविध कार्यक्रम आयोजित करत आहे ?