
मोरारी बापू यांच्याकडून अर्थपूर्ण राम कथा ऐकायला मिळणे हा प्रत्येकासाठी सौभाग्याचा क्षण आहे. प्रभू रामचंद्राचे जीवन हे मर्यादेचे पालन करणारे आहे. त्यामुळे ते सर्वोत्तम मर्यादा पुरुष ठरले आहेत. राम कथा ही त्याग, तप, तेज, अनुशासन आणि भावनांचा संगम आहे. आज पाचशे वर्षानंतर प्रभू राम अयोध्येत त्यांच्या हक्काच्या ठिकाणी विराजमान झाले आहेत. ही प्रत्येक भारतीयाला गौरव वाटणारी बाब आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथील चिंतामणी कृषी उत्पन्न बाजार समितीत आयोजित मोरारी बापू यांच्या राम कथा प्रवचन कार्यक्रमात केले.
यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते जवाहरलाल दर्डा यांच्या जीवनावर आधारित ‘पेन ॲण्ड पर्पज’ पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. तसेच मुख्यमंत्र्यांच्या हस्ते जवाहरलाल दर्डा यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त प्रकाशित शंभर रुपयांचे नाणे मोरारी बापू यांना समर्पित करण्यात आले.
यावेळी पालकमंत्री संजय राठोड, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, आदिवासी विकास मंत्री अशोक उईके, राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर, खासदार संजय देशमुख, बळवंत वानखेडे, आमदार बाळासाहेब मांगुळकर, किशोर जोरगेवार, राजू तोडसाम, ॲड आशिष देशमुख, किसनराव वानखेडे, सईताई डहाके, रामकथाचे आयोजक डॉ. विजय दर्डा, राजेंद्र दर्डा आदी उपस्थित होते.