Home आरोग्य राज्यातील खासगी प्रसूती रुग्णालयांमध्ये सेवा गुणवत्ता वाढवून प्रसूतीदरम्यान होणाऱ्या मातामृत्यूचे प्रमाण कमी

राज्यातील खासगी प्रसूती रुग्णालयांमध्ये सेवा गुणवत्ता वाढवून प्रसूतीदरम्यान होणाऱ्या मातामृत्यूचे प्रमाण कमी

3
Reduce maternal mortality rate during childbirth by improving service quality in private maternity hospitals in the state

राज्य शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून व पुढाकाराने ‘लक्ष्य-मान्यता’ (LaQshya-Certification) हा अभिनव उपक्रम सुरू केला आहे.

राज्यातील सर्व खासगी रुग्णालयांमध्ये दर्जात्मक, सुरक्षित आणि आदरयुक्त प्रसूती सेवा (Respectful Maternity Care) सुनिश्चित करण्यासाठी हा उपक्रम राबविण्यात येत आहे. महाराष्ट्राने मागील काही वर्षांत मातामृत्यू कमी करण्यात उल्लेखनीय प्रगती केली आहे. आता हा प्रयत्न खासगी क्षेत्रापर्यंत विस्तारित करण्यात आला आहे.

महाराष्ट्र शासनाचा सार्वजनिक आरोग्य विभाग, फेडरेशन ऑफ ऑब्स्टेट्रिक ॲण्ड गायनॉकॉलॉजिकल सोसायटीज ऑफ इंडिया (FOGSI) आणि Jhpiego या आंतरराष्ट्रीय आरोग्य संस्थेच्या सहकार्याने राबविण्यात येत आहे.