Home महाराष्ट्र साहित्य अकादमीचे बाल साहित्य व युवा साहित्य पुरस्कार 2026 साठी आवाहन पुस्तकांच्या...

साहित्य अकादमीचे बाल साहित्य व युवा साहित्य पुरस्कार 2026 साठी आवाहन पुस्तकांच्या नोंदणीला सुरुवात

3
Registration of books for Sahitya Akademi's Children's Literature and Youth Literature Awards 2026 begins

नवी दिल्ली: साहित्य अकादमीने बाल साहित्य पुरस्कार 2026 आणि युवा साहित्य पुरस्कार 2026 साठी पुस्तकांची नोंदणी सुरू केली आहे. अकादमीने मान्य केलेल्या 24 भारतीय भाषांमधील लेखक, प्रकाशक तसेच साहित्यप्रेमींना आपली पुस्तके पाठविण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

बाल साहित्य पुरस्कारासाठी पात्रता

बाल साहित्य पुरस्कार 2010 पासून दरवर्षी 24 भारतीय भाषांमध्ये उत्कृष्ट बालसाहित्य निर्मितीसाठी दिला जातो. मराठीसह, आसामी, बंगाली, बोडो, डोगरी, इंग्रजी, गुजराती, हिंदी, कन्नड, काश्मीरी, कोकणी, मैथिली, मल्याळम, मणिपुरी, नेपाळी, ओडिया, पंजाबी, राजस्थानी, संस्कृत, संथाली, सिंधी, तमिळ, तेलुगु आणि उर्दू या भाषांमध्ये लिहिलेली पुस्तके विचारात घेतली जातील.

पुस्तके 9 ते 16 वयोगटातील मुलांना लक्षात घेऊन लिहिलेली असावीत आणि ती 1 जानेवारी 2020 ते 31 डिसेंबर 2024 या कालावधीत पहिल्यांदाच प्रकाशित झालेली असावीत. अर्ज करण्याची अंतिम तारीख 31 ऑगस्ट 2025 आहे.

युवा साहित्य पुरस्कारासाठी पात्रता

2011 पासून सुरू झालेल्या युवा साहित्य पुरस्काराचा उद्देश 35 वर्षांखालील तरुण लेखकांना प्रोत्साहन देणे हा आहे. 1 जानेवारी 2026 पर्यंत लेखकाचे वय 35 वर्षे किंवा त्यापेक्षा कमी असावे. अर्जदाराने प्रत्येक पुस्तकाच्या दोन प्रती तसेच जन्मतारखेचा पुरावा (आधार कार्ड, पासपोर्ट, ड्रायव्हिंग लायसन्स किंवा मतदार कार्ड) स्व-प्रमाणित प्रतीसह पाठवावा. पुस्तक सादर करण्याची अंतिम मुदत 31 ऑगस्ट 2025 पर्यंत आहे.

बाल आणि युवा पुरस्कार स्वरूपात 50,000/- रूपये रोख, ताम्रपट आणि प्रशस्तीपत्र प्रदान केले जाईल. साहित्य अकादेमीच्या संकेतस्थळावर (www.sahityaakademi.gov.in) पुरस्कारासंबंधी सर्व नियम आणि सविस्तर माहिती उपलब्ध आहे.

00000000000

महाराष्ट्र परिचय केंद्र, नवी दिल्ली –

वृत्त विशेष – 165

एक्स वर आम्हाला फॉलो करा:

https://x.com/MahaGovtMic /https://x.com/micnewdelhi /https://x.com/MahaMicHindi