
राज्यात मोठ्या प्रमाणात फुलांचे उत्पादन होते. जानेवारी आणि फेब्रुवारी वगळता मुंबई हे फुलांचे सर्वात मोठे खरेदी विक्री केंद्र आहे. वर्षभर या ठिकाणी फुलांची मागणी मोठ्या प्रमाणात होते. फुल हा शेतमाल नियमनाखाली नसल्याने आणि सर्व सुविधायुक्त स्वतंत्र बाजारपेठ उपलब्ध नसल्याने शेतकऱ्यांना आणि व्यापाऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागतो. बृहन्मुंबईत फुलांची स्वतंत्र बाजारपेठ सुरू करणे आवश्यक आहे. त्यासाठी तातडीने कार्यवाही करुन दादर, गोरेगाव अथवा नवी मुंबई येथे अत्याधुनिक सोयी-सुविधांयुक्त फुल बाजारासाठी जागा शोधून ती उपलब्ध करून देण्यात यावी – जयकुमार रावल
यावेळी झालेल्या बैठकीत आमदार मनिषा चौधरी, पणन विभाग, कृषी उत्पन्न बाजार समिती, बृहन्मुंबई महानगरपालिका आणि संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.















