
(अक्कलकुवा) छत्रपती शिवाजी महाराज महसूल अभियानांतर्गत अक्कलकुवा तालुक्यात महसूल समाधान शिबिर उत्साहात पार पडले. अक्कलकुवा विधानसभा मतदारसंघाचे आमदार श्री. आमश्या फुलजी पाडवी यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजित या शिबिरात विविध शासकीय योजनांचा लाभ नागरिकांपर्यंत पोहोचविण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज व स्व. अजितदादा पवार यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण व दीपप्रज्वलनाने करण्यात आली.
शिबिरात महसूल, ग्रामविकास, पुरवठा, आरोग्य, सामाजिक वनीकरण आदी विभागांनी नागरिकांना विविध सेवांचा लाभ दिला. बालिकांना क्रिकेट बॅट, अपंग कुटुंबियांना व्हीलचेअर, सिकलसेल व गरजू मातांना मदत, शिधापत्रिका वितरण, सातबारा व इतर दाखल्यांचे वाटप तसेच विविध योजनांबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
या महसूल समाधान शिबिरातून **एकूण २,७६४ लाभार्थ्यांना** विविध शासकीय योजनांचा प्रत्यक्ष लाभ देण्यात आला. विविध विभागांनी नागरिकांना शासनाच्या कल्याणकारी योजनांची माहिती देत सेवा अधिक सुलभ व लोकाभिमुख करण्यावर भर दिला.
शासनाच्या लोकाभिमुख उपक्रमांना नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. विविध विभागांच्या समन्वयातून आयोजित हे शिबिर प्रभावी, पारदर्शक आणि नागरिकाभिमुख प्रशासनाचे उत्तम उदाहरण ठरले.
#छत्रपतीशिवाजीमहाराजमहसूलअभियान#महसूलसमाधानशिबिर#अक्कलकुवा#महसूलविभाग#महाराष्ट्रशासन#लोकाभिमुखप्रशासन#जनकल्याण#Nandurbar#RevenueDepartment















