(नंदुरबार)
मा. जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा विकास आराखडा (District Strategic Plan) अंतर्गत विविध प्रकल्पांबाबत आढावा बैठक घेण्यात आली.
या बैठकीत MahaSTRIDE प्रकल्पांतर्गत प्रस्तावित योजनांवर सविस्तर चर्चा झाली. जिल्ह्याच्या कृषी क्षेत्रातील महत्त्वाचे उत्पादन असलेल्या GI टॅग प्राप्त तुर व मिरची निर्यात करण्यासाठी आवश्यक कार्यवाही करण्याबाबत विशेष भर देण्यात आला. यासोबतच कमी क्षमतेचे गोडाऊन उभारणी व नैसर्गिक शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी दिशा निर्देश देण्यात आले.
बैठकीत उद्योगसंबंधी अडचणींचा आढावा घेऊन, त्यांचे निराकरण करण्यासाठी वीज व पाणी पुरवठ्यासाठी प्रयत्न करण्याचे निर्देश दिले. तसेच तोरणमाळ येथे रुरल मार्ट उभारण्याचा मानस व्यक्त करण्यात आला. जिल्ह्यातील अपूर्ण सिंचन प्रकल्प वेळेत पूर्ण करण्यासाठीही प्रयत्न करण्याचे ठरले.
या बैठकीत कृषी, उद्योग, पायाभूत सुविधा यांसह विविध प्रकल्पांवर चर्चा होऊन जिल्हा विकासाला गती देण्यासाठी पुढील कृती आराखडा निश्चित करण्यात आला.
बैठकीस उपस्थित:
श्री. शशांक काळे (जिल्हा नियोजन अधिकारी)
श्री. सि. के. ठाकरे (जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी)
श्री. दिपक पटेल (प्रकल्प संचालक, आत्मा)
श्री. रवि मोरे (DDM नाबार्ड)
श्री. राहुल पाटील (अधीक्षक अभियंता, मध्यम प्रकल्प)
श्री. राजेंद्र दहातोंडे (शास्त्रज्ञ, कृषी विज्ञान केंद्र)
श्री. एन. पी. पाटील (व्यवस्थापक, जिल्हा उद्योग केंद्र)
तालुका कृषी अधिकारी, उद्योजक व शेतकरी उत्पादक कंपन्यांचे प्रतिनिधी
ही बैठक जिल्हा विकास आराखड्यातील प्रकल्पांना गती देण्यासाठी व अंमलबजावणी प्रभावी करण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरली.
#DistrictStrategicPlan#MahaSTRIDE#Nandurbar#Agriculture#giproducts#tuar#chilli#naturalfarming#irrigationprojects