जिल्ह्यातील आगामी सण-उत्सव शांततेत पार पडावेत तसेच कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी जिल्हा प्रशासन व पोलीस विभागाच्या वतीने जिल्हास्तरीय व तालुकास्तरीय शांतता समिती बैठकीचे आयोजन करण्यात आले. ही बैठक जिल्हाधिकारी कार्यालयातील बिरसा मुंडा सभागृहात दुपारी 3.00 वाजता पार पडली.
जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीस जिल्हाभरातील शांतता समितीचे 100 ते 120 सदस्य उपस्थित होते. बैठकीत आगामी सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर कायदा-सुव्यवस्थेसंदर्भात चर्चा करण्यात आली. सार्वजनिक कार्यक्रमांचे नियोजन, गर्दी नियंत्रण, वाहतूक व्यवस्थापन, पोलिस बंदोबस्त आदी विषयांवर सविस्तर विचारमंथन करण्यात आले.
बैठकीस उपस्थित मान्यवर:
माजी आदिवासी विकास मंत्री ॲड.के. सी. पाडवी
माजी खासदार डॉ.हिना गावीत
जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी
जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्त. एस
निवासी उपजिल्हाधिकारी हरिष भामरे
नंदुरबार उपविभागीय दंडाधिकारी अंजली शर्मा
शहादा उपविभागीय अधिकारी कृष्णकांत कनवारीया.
नंदुरबार तहसीलदार पवन दत्ता
सहायक पोलीस अधिक्षक दर्शन दुगड
उपविभागीय पोलीस अधिकारी नंदुरबार संजय महाजन
शहादा उपविभागीय पोलीस अधिकारी दत्ता पवार
स्थानिक गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक हेमंत पाटील
जिल्हा विशेष शाखा पोलीस निरीक्षक संदीप पाटील
तसेच जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांचे प्रभारी अधिकारी व प्रशासकीय अधिकारी
सण-उत्सव आनंदाने साजरे करूया, शांतता राखूया!

#शांतता_समिती#नंदुरबार#सण_उत्सव#कायदा_सुव्यवस्था#Nandurbar#Police#PeaceCommittee#FestivalSafety