
प्रधानमंत्री_उज्ज्वला_योजना अधिक प्रभावी करण्यासाठी आकांक्षित नंदुरबार जिल्ह्यात महत्त्वपूर्ण बैठक !
भारत सरकारचे पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाचे उपसचिव समीरकुमार मोहंती यांनी जिल्ह्यातील अधिकाऱ्यांसोबत घेतला आढावा.
जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांनी उज्ज्वला योजनेअंतर्गत अधिक गॅस जोडण्याच्या लक्ष्यवाटपाची मागणी केली.
सीएसआर अंतर्गत आरोग्य आणि पर्यटन क्षेत्रासाठी निधी मिळवण्याची गरज – इंधन कंपन्यांना सूचना!
आकांक्षित नंदुरबार जिल्ह्यात सीएनजी पंप उभारणी, बायोगॅस प्रकल्प आणि नैसर्गिक वायू पाईपलाइन प्रकल्पावर चर्चा!
ग्रामीण भागातील महिलांना मोठा दिलासा !
अक्कलकुवा व अक्राणी तालुक्यात गॅस उपलब्धता केवळ 42% आणि 60% घरांमध्ये गॅस जोडणी!
गॅस कंपन्यांना या भागात अधिक लक्ष देण्याचे स्पष्ट निर्देश !
गॅस कनेक्शनची प्रक्रिया अधिक सुलभ करण्यासाठी उपाययोजना !
लाभार्थ्यांच्या उत्स्फूर्त प्रतिक्रिया!
गॅस जोडणीमुळे महिलांना स्वयंपाक अधिक सोपा आणि वेगवान, चुलीच्या धुरामुळे होणारा त्रास आता नाही !
जळकी भांडी आणि वेळेचा अपव्यय आता इतिहास !
लाभार्थ्यांशी थेट संवाद साधून श्री. मोहंती यांनी ऐकले त्यांच्या अनुभवांच्या कथा !
बैठकीत उज्ज्वला योजना अधिक प्रभावीपणे राबवण्याचा निर्णय !
बैठकीत उपस्थित मान्यवर:
गणेश मिसाळ, जिल्हा पुरवठा अधिकारी
श्री. चेतन पटवारी, आयओसीएल डिव्हिजनल सेल्स हेड
श्री. इक्बाल सिद्दिकी (भारताच्या कसोटी क्रिकेट संघाचे माजी खेळाडू) उप महाव्यवस्थापक, इंडियन ऑइल कंपनी
पियुष गुजराथी, बीपीसीएल टेरिटरी मॅनेजर
जे. व्ही. अममिलेश्वर राव, एचपीसीएल क्षेत्रीय व्यवस्थापक
वीरेंद्र अहिरवार, आयओसीएल विक्री अधिकारी
हिमांशू स्वान, बीपीसीएल विक्री अधिकारी
गोपाल घडमोडे, एचपीसीएल विक्री अधिकारी
शासनाच्या मार्गदर्शनाखाली आकांक्षित नंदुरबार जिल्ह्यातील उज्ज्वला लाभार्थ्यांना अधिक चांगल्या सुविधा मिळणार!
#PMUY
#UjjwalaYojana
#गॅससर्वांसाठी
#स्वच्छइंधन
#CNG
#BioGas
#CleanEnergy
#NarendraModi
#आकांक्षित_जिल्हा
#नंदुरबार
#WomenEmpowerment
#SmartIndia
#LPGForAll
#IndiaRising
#RuralDevelopment