तळोदा (ता. तळोदा): सततच्या पावसामुळे चांदसैली घाटातील लांबीत मोठ्या प्रमाणात दरड कोसळल्याने तळोदा–कोठार–धडगाव या राज्य मार्ग क्रमांक ८ वरील वाहतूक पूर्णपणे बंद झाली आहे. दरडीमुळे रस्त्यावर मोठ्या प्रमाणात मलबा साचला असून, वाहतुकीस अडथळा निर्माण झाला आहे.
सध्या जे.सी.बी. मशीनच्या सहाय्याने मलबा हटविण्याचे काम प्रगतीपथावर आहे. प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, उद्या दिनांक २७ ऑक्टोबर २०२५ रोजी सकाळी सुमारे ७ वाजता मलबा बाजूला करण्याचे काम पुन्हा सुरू करण्यात येईल. दुपारपर्यंत रस्ता वाहतुकीसाठी सुरू होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
तोपर्यंत नागरिकांनी आणि वाहनचालकांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा, अशी विनंती सार्वजनिक बांधकाम विभाग आणि स्थानिक प्रशासनाने केली आहे.
#PublicWorksDepartment#Nandurbar#TrafficAlert#WeatherUpdate#RoadClosed#SafetyFirst#RainImpact#MaharashtraNews
















