(नंदुरबार)
सा. बां. विभाग नंदुरबार मार्फत नागरिकाभिमुख आणि गुणवत्तापूर्ण सेवा पुरविण्याचे काम सातत्याने होत असून, या विभागाने प्रादेशिक स्तरावर प्रथम आणि राज्यातील पहिल्या तीनमध्ये स्थान मिळवले आहे. सा. बांधकाम विभाग, नंदुरबार मार्फत विविध उपक्रम हाती घेऊन रस्ते सुरक्षा, खड्डे दुरुस्ती आणि बांधकाम विषयक समस्यांवर ठोस पावले उचलण्यात येत आहेत.
जिल्हा रस्ते सुरक्षा समिती बैठक:
मा. जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या अध्यक्षतेखाली ‘जिल्हा रस्ते सुरक्षा समिती’ची बैठक पार पडली. यात जिल्ह्यातील रस्ते अपघात कमी करण्यासाठी आणि सुरक्षितता वाढवण्यासाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले.
अभियंता दिन विशेष उपक्रम:
‘अभियंता दिना’ निमित्त तांत्रिक चर्चासत्र आणि आधुनिक मटेरियलविषयी माहितीचे आयोजन करण्यात आले. यावेळी का. अ. श्री. अंकुश पालवे यांच्या पुढाकाराने उपभियंता श्री. गणपत गावित व शाखा अभियंता श्री. राजू मार्तंड यांनी आगामी वर्षात किमान एका रस्त्याच्या कामात ‘वेस्ट प्लास्टिकचा वापर’ करण्याचा निर्धार केला. त्यासाठी विशेष अभ्यास मोहीम व दौरे नियोजित आहेत.
बांधकाम विषयक सुधारणा:
जिल्हा सामान्य रुग्णालयातील बांधकाम समस्या सोडवण्यासाठी एक एकीकृत व बृहत आराखडा तयार करण्याचे काम सुरू आहे. त्याचबरोबर का. अ. अंकुश पालवे यांनी अनेक कामांना स्वतः भेटी देऊन पाहणी केली आणि आवश्यक सूचना दिल्या.
खड्डे दुरुस्ती – नागरिकांना दिलासा:
रस्त्यांवरील खड्डे दुरुस्तीकरिता शासन स्तरावर प्रस्ताव सादर करण्यात आला असून निविदा प्रक्रिया सुरू आहे. डांबरी दुरुस्तीचे काम लवकरच पूर्ण होणार आहे. तोपर्यंत तात्पुरत्या स्वरूपातील दुरुस्ती सुरू असून नागरिकांना मोठा दिलासा मिळत आहे.
नागरिकांच्या मागण्या व विभागाची प्राधान्ये:
नागरिकांनी MSRDC, NH, NHAI अशा इतर संबंधित विभागांनीही खड्डे दुरुस्ती व रस्ते सुधारणा करावी अशी मागणी केली आहे. सा. बां. विभागांतर्गत खड्डे दुरुस्ती, वृक्ष लागवड, सेवा हमी कायद्यांतर्गत सेवा, तक्रार निराकरण आणि शासनाच्या १५० दिवसांच्या कार्यक्रमात नंदुरबार विभाग अग्रगण्य आहे.
गुणवत्तापूर्ण व गतीमान सेवा:
कामाची गुणवत्ता, गती आणि नागरिकांना सुलभ सेवा मिळावी यासाठी का. अ. अंकुश पालवे यांचे विशेष प्रयत्न असून त्यांना उपभियंता व संपूर्ण टीमची साथ लाभत आहे.

#nandurbar#PWD#roadsafety#engineerday#wasteplasticroads