(नंदुरबार) आरोग्य विभाग जिल्हा परिषद नंदुरबार, प्लॅन इंडिया आणि रेकिट यांच्या सहकार्याने राबविण्यात येणाऱ्या Self-Care for New Moms and Kids under 5 Project (Powered by Reckitt) या उपक्रमांतर्गत ‘सांस’ (SAANS – Social Awareness and Action to Neutralise Pneumonia) या जनजागृती अभियानाचा नंदुरबार जिल्ह्यात शुभारंभ करण्यात आला.
या अभियानाचे उद्घाटन मा. जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी (IAS) आणि मा. मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. नमन गोयल (IAS) यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. रवींद्र सोनवणे, तसेच उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ICDS) श्री. हरिभाऊ हाके उपस्थित होते.
‘सांस’ अभियानाचा मुख्य उद्देश म्हणजे ५ वर्षाखालील बालकांमध्ये होणाऱ्या निमोनिया या आजाराबाबत समाजात जागरूकता निर्माण करणे, त्याचे लवकर निदान व वेळीच उपचार सुनिश्चित करणे हा आहे.
हे अभियान दिनांक २८ फेब्रुवारी २०२६ पर्यंत राबविण्यात येणार असून, बालकांचे आरोग्य सुरक्षित ठेवण्यासाठी विविध स्तरांवर आरोग्य जनजागृती कार्यक्रम, प्रशिक्षण, व समुदाय आधारित उपक्रम आयोजित केले जाणार आहेत. तसेच नंदुरबार जिल्ह्यातील ग्रामीण व आदिवासी भागांपर्यंत पोहोचविण्यासाठी आरोग्य विभाग, अंगणवाडी सेविका, आशा स्वयंसेविका आणि स्थानिक स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून व्यापक स्वरूपात राबविण्यात येणार आहे.
@who_india @planindia @thisisreckitt @ministrywcd @mohfwindia @dettol.india @banegaswasthindia @bhatnagar304 @komal037 @HandwashingSoap
#Nandurbar#SAANSCampaign#DrMitaliSethi#NamanGoyal#HealthAwareness#ChildHealth#PneumoniaAwareness#ZPNandurbar
















