
(नंदुरबार) कृषी क्षेत्रात उत्पादकता वाढविण्यासोबतच शेतकऱ्यांनी बाजारपेठेवर मजबूत पकड तयार करणे अत्यावश्यक असल्याचे स्पष्ट करत जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांनी सांगितले, “सुधारीत तंत्रज्ञान स्वीकारणे हे पहिलं पाऊल आहे; पण विक्री व्यवस्थापनाशिवाय शाश्वत यश मिळत नाही. शेतकरी संघटित झाले तरच मूल्यवर्धन आणि नफा दोन्ही वाढतात.”
त्या कृषि विज्ञान केंद्रात आयोजित ‘आपलं गाव – आपलं पाणी’ परिषदेत मार्गदर्शन करत होत्या. कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. नितीन पंचभाई होते. प्रमुख अतिथी म्हणून श्री. केदारनाथ कवडीवाले, विशेष अतिथी श्री. राजेंद्र कासार व डॉ. यु. बी. होले उपस्थित होते.
पाणी व्यवस्थापन आणि कार्यक्षमतेवर भर
डॉ. मित्ताली सेठी यांनी पाणी वापर संस्थांचे बळकटीकरण, सूक्ष्म सिंचन तंत्रांचा अवलंब व जलस्रोतांचे शाश्वत संवर्धन यावर भर दिला. जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी पाचवर्षीय विक्री व्यवस्थापन आराखडा तयार करण्याची गरजही त्यांनी अधोरेखित केली.
तज्ज्ञांचे प्रभावी मार्गदर्शन
• श्री. जयंत उत्तरवार – आधुनिक पाणी व्यवस्थापन पद्धतींचे सादरीकरण
• श्री. राजेंद्र दहातोंडे – संपूर्ण महोत्सवाचा आढावा
• डॉ. पंचभाई – केव्हीकेच्या सातत्यपूर्ण उपक्रमांचे कौतुक
• डॉ. होले – हरभरा उत्पादनवाढीसाठी पंचसूत्री मार्गदर्शन
• श्री. कासार व श्री. कवडीवाले – संवर्धन, साठवण आणि पाणी वाटपातील सामूहिक जबाबदारीवर भर
प्रयोगशील शेतकऱ्यांचा गौरव
सुरेश पाटील (होळ), विठोबा माळी (जयनगर), धर्मा तडवी (बालाघाट), सुकलाल पावरा (भूजगाव) यांसह अनेक शेतकऱ्यांना अभिनव पाणी व्यवस्थापन पद्धतींसाठी सन्मानित करण्यात आले.
प्रकल्पांची माहिती व प्रदर्शनी
डेव्हलपमेंट सपोर्ट सेंटर, आयटीसी प्रकल्प, आत्मा व सेवा समितीच्या प्रकल्पांनी पाणी वापर संस्था व चालू उपक्रमांची प्रदर्शनी सादर केली.
कार्यक्रमात मोठ्या संख्येने शेतकरी व महिला सहभागी झाले. सूत्रसंचालन श्री. जयंत उत्तरवार, आभार प्रदर्शन डॉ. वैभव गुर्वे यांनी केले.
#Nandurbar#Agriculture#DrMitaliSethi#आपलंगावआपलंपाणी#KVKNandurbar#AgriTechnology#SmartFarming#WaterManagement#FarmersProgress#KisanVikas#SustainableAgriculture#NandurbarUpdates#AgritechIndia#FarmerEmpowerment















