
नवापूर तालुक्यातील केळी, भरडू, लहान कडवान, मोठे कडवान, केलपाडा, सोनारे तसेच नंदुरबार तालुक्यातील खर्दे खुर्द येथे रब्बी हंगाम 2025-26 अंतर्गत बीजप्रक्रिया व उगवण क्षमता चाचणी प्रात्यक्षिके घेण्यात आली. या प्रात्यक्षिकांमध्ये मंडळ कृषि अधिकारी श्री. दिनकर तावाडे, उपकृषी अधिकारी श्री. सुनील पवार, सहाय्यक कृषी अधिकारी आणि मोठ्या संख्येने शेतकरी बांधव उपस्थित होते. शेतकऱ्यांनी या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
उपक्रमाचे महत्त्व व उद्दिष्टे:
1. शेतकऱ्यांना स्वतःकडील किंवा घरगुती बियाण्याचे बीजप्रक्रियेमार्फत शुद्धीकरण करण्यास प्रोत्साहन
2. बियाण्याव्दारे पसरणाऱ्या जीवाणूजन्य, विषाणूजन्य किंवा बुरशीजन्य रोगांवर नियंत्रण
3. पिकांचे उगवण प्रमाण वाढविणे
4. शेती उत्पादनाची गुणवत्ता आणि प्रमाण सुधारणे
5. बीजप्रक्रियायुक्त बियाण्याचा वापर वाढवून आरोग्यदायी आणि प्रतिकारक्षम पिके तयार करणे हे मोहिमेचे प्रमुख उद्दिष्ट आहे.
या रब्बी हंगामातील लक्ष केंद्रीत पिके:
या प्रात्यक्षिक मोहिमेत हरभरा, रब्बी ज्वारी, रब्बी मका, गहू, करडई, तीळ, जवस रब्बी पिकांसाठी बीजप्रक्रिया तंत्राचे प्रात्यक्षिक दिले जात आहे: सर्व पिकांसाठी योग्य औषधोपचार, उगवण चाचणी, बियाण्याचा पोत, गुणवत्ता आणि शेतात पेरणीपूर्व तयारी याबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.
सहाय्यक कृषी अधिकाऱ्यांकडून गावोगावी प्रात्यक्षिके:
या मोहिमेअंतर्गत प्रत्येक सहाय्यक कृषि अधिकाऱ्याच्या कार्यक्षेत्रातील गावांमध्ये नियमित शेतीशाळांमध्ये बीजप्रक्रिया प्रात्यक्षिके घेण्यात येणार आहेत.
गावाच्या संपूर्ण पिक क्षेत्रावर बीजप्रक्रियायुक्त बियाणे लावण्यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहित करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
उपक्रमाचा अपेक्षित परिणाम:
1. बियाण्याची उगवणक्षमता वाढ
2. रोग प्रतिकारशक्तीत वाढ
3. रब्बी पिकांचे उत्पादन अधिक आणि गुणवत्तापूर्ण
4. रासायनिक वापरात घट व खर्चात बचत
5. पिकांच्या आरोग्यदायी वाढीमुळे शेतकऱ्यांचा आर्थिक लाभ
रब्बी हंगामातील पिक उत्पादन वाढविण्यासाठी बीजप्रक्रिया हा अत्यावश्यक टप्पा आहे. कृषी विभागाच्या पुढाकारामुळे शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञान, योग्य प्रशिक्षण आणि प्रत्यक्ष मार्गदर्शन उपलब्ध होत असून, संपूर्ण जिल्ह्यात बीजप्रक्रियायुक्त पेरणीची चळवळ जोर धरत आहे.
#rabiseason2025#seedtreatment#nandurbar#KrishiVibhag#FarmerAwareness















