Home शहादा मिरची व केळी पीकावर चर्चासत्र संपन्न – शहादा येथे २०० हून अधिक...

मिरची व केळी पीकावर चर्चासत्र संपन्न – शहादा येथे २०० हून अधिक शेतकऱ्यांचा सहभाग

3
Seminar on chilli and banana crops concluded – More than 200 farmers participated in Shahada

ठिकाण: एस. कुमार लॉन्स, शहादा

ग्रीन टीव्ही व कृषी विभाग, नंदुरबार यांच्या संयुक्त विद्यमाने मिरची व केळी या महत्वाच्या पिकांवर केंद्रित चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले. यामध्ये जिल्ह्यातील २०० हून अधिक प्रगतशील शेतकऱ्यांनी सहभाग नोंदवला.

मान्यवरांची उपस्थिती:

🔹 उपविभागीय कृषी अधिकारी के. एस. वसावे

🔹 वरिष्ठ शास्त्रज्ञ दहातोंडे सर, कृषी विज्ञान केंद्र, कोळदा

🔹 गुळवे सर, पीक व्यवस्थापन विषयतज्ज्ञ

🔹 प्रा. चौधरी सर, मृदशास्त्र विभाग, कृषी महाविद्यालय, लोणखेडा

🔹 जिल्हा संसाधन व्यक्ती (PMFME)

🔹 तंत्र अधिकारी गणेश सदगीर, व शहादा मंडळ कृषी अधिकारी व कर्मचारी

चर्चासत्रातील प्रमुख मुद्दे:

1. मृदा व्यवस्थापनावर सखोल मार्गदर्शन:

प्रा. चौधरी यांनी मिरची व केळी पिकासाठी मातीची तयारी, पोषण व्यवस्थापन व खतांचा संतुलित वापर यावर प्रकाश टाकला.

2. प्रश्नमंजुषा व बक्षीस वितरण:

शेतकऱ्यांनी विचारलेल्या प्रश्नांना बरोबर उत्तरे देणाऱ्यांना ग्रीन टीव्हीमार्फत गौरवण्यात आले.

3. पीक व्यवस्थापन व प्रोसेसिंग:

गुळवे सरांनी पीक व्यवस्थापनाच्या तांत्रिक बाबी, तर दहातोंडे सरांनी केळी व मिरचीच्या बाजारपेठ व प्रक्रिया उद्योगावर सविस्तर माहिती दिली.

4. कृषी योजनांचे सविस्तर मार्गदर्शन:

वसावे सरांनी पिक विमा योजना, पीक स्पर्धा, AgriStack Farmer ID, महाडिबीटी पोर्टलवरील योजना याविषयी माहिती दिली. यासोबतच महाडिबीटीवर प्रथम अर्ज करणाऱ्यांना मिळणाऱ्या प्राधान्याबाबतही मार्गदर्शन केले.

5. PMFME योजनेंतर्गत ३५% अनुदानासह मूल्यवर्धन प्रकल्पांबाबत माहिती देण्यात आली.

कार्यक्रमाच्या शेवटी केळी उत्पादनात उत्तम कामगिरी करणाऱ्या शेतकऱ्यांना ग्रीन टीव्ही व कृषी विभागाच्या वतीने सन्मानित करण्यात आले.

सुत्रसंचालन ग्रीन टीव्हीच्या अंशू मॅडम यांनी केले.

#कृषीविकास#pmfme#agristack#GreenTV#मिरची_केळी_चर्चासत्र#शहादा#nandurbaragriculture#FarmersEmpowerment