
पुणे: गर्भाशयमुख कर्करोगावर लसीद्वारे प्रतिबंध घडवून आणण्यासाठी सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने पुढाकार घ्यावा, अशी अपेक्षा राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांनी व्यक्त केली.
हडपसर येथील सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया येथे भेट देऊन संस्थेतील चालू संशोधन, लसनिर्मिती प्रक्रिया आणि भविष्यातील प्रकल्पांची पाहणी केली. यावेळी सिरम इन्स्टिट्यूटचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. सायरस पूनावाला यांच्याशी त्यांनी सविस्तर चर्चा केली आणि गर्भाशयमुख कर्करोगावर प्रतिबंधात्मक लस तयार करण्याच्या उपक्रमाविषयी माहिती घेतली.
नजागृती, वेळेत निदान आणि उपचार हेही तितकेच महत्त्वाचे घटक आहेत. राज्यात महिलांमध्ये गर्भाशयमुख कर्करोगाचे प्रमाण लक्षात घेता, प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविणे आणि तपासणी मोहिमा आयोजित करणे अत्यावश्यक असल्याचेही श्री. आबिटकर यांनी सांगितले.
डॉ. पूनावाला म्हणाले, “गर्भाशयमुख कर्करोग हे महिलांमध्ये आढळणारे प्रमुख आरोग्य आव्हान आहे. या पार्श्वभूमीवर सिरम इन्स्टिट्यूट ‘एचपीव्हीलस विकसित करण्याचे काम करत आहे.
श्री. आबिटकर सिरम इन्स्टिट्यूटच्या भेटीदरम्यान संस्थेचे संशोधन विभाग, लसनिर्मिती युनिट आणि प्रयोगशाळा यांचीही यांनी पाहणी केली. यावेळी डॉ. सायरस पूनावाला आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांची उपस्थित होते.















