Home अक्कलकुवा अक्कलकुवा बस दुर्घटनेतील बालरुग्णांच्या नातेवाईकांसाठी मानसोपचार विभागाची सामाजिक बांधिलकी — जिल्हा रुग्णालय...

अक्कलकुवा बस दुर्घटनेतील बालरुग्णांच्या नातेवाईकांसाठी मानसोपचार विभागाची सामाजिक बांधिलकी — जिल्हा रुग्णालय नंदुरबारचा उपक्रम

1
Social commitment of the Psychiatry Department for the relatives of the pediatric patients in the Akkalkuwa bus accident — an initiative of District Hospital Nandurbar

अक्कलकुवा बस दुर्घटनेत उपचार घेत असलेल्या बालरुग्णांच्या नातेवाईकांना मानसिक आणि सामाजिक आधार देण्यासाठी जिल्हा रुग्णालय, नंदुरबारच्या मानसोपचार विभागातर्फे एक संवेदनशील उपक्रम राबविण्यात आला.

या उपक्रमांतर्गत मंगळवार, दिनांक ११ नोव्हेंबर २०२५ रोजी महिला रुग्णालयात सर्व नातेवाईकांसाठी रात्रीच्या जेवणाची व्यवस्था करण्यात आली. तसेच बुधवार, दिनांक १२ नोव्हेंबर २०२५ रोजी सर्व रुग्ण आणि नातेवाईकांना फळांचे वाटप करण्यात येणार आहे.

ही सामाजिक बांधिलकीची कृती मानसोपचार विभाग प्रमुख डॉ. दिनेश वळवी (मानसोपचारतज्ज्ञ) यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. या उपक्रमात डॉ. अतुल वळवी, परशुराम गवळी (समाजसेवा अधीक्षक), श्री. सुभाष पवार (समोपदेशक), श्री. प्रविण डोंगरे, श्रीमती विद्या बुंदेले, श्रीमती करुणाताई चौधरी (सामाजिक कार्यकर्त्या), श्री. रमश्या वळवी, श्री. मनिष ठाकरे, आणि श्री. आशुतोष सोनार (DMHP टीम) यांनी सक्रीय सहभाग घेतला.

या माध्यमातून जिल्हा रुग्णालयाच्या मानसोपचार विभागाने केवळ वैद्यकीयच नव्हे, तर मानवी संवेदना आणि सामाजिक जबाबदारी जपणारे उदाहरण घालून दिले आहे. अक्कलकुवा बस दुर्घटनेतील पीडित कुटुंबांना मानसिक स्थैर्य आणि भावनिक आधार देण्यासाठी या टीमने केलेले प्रयत्न प्रशंसनीय ठरले आहेत.

#Nandurbar#DistrictHospital#MentalHealthSupport#SocialResponsibility#AkkalkuwaBusAccident#HumanityFirst#DMHP#HealthAwareness