
स्थळ: तहसील कार्यालय, धडगाव
धडगाव तालुक्यातील अतिदुर्गम भागातील ग्रामस्थांना आधार, बँक सेवा, पाणी, शिक्षण, आरोग्य, शौचालय, रेशन अशा मूलभूत सुविधा पुरविण्यासाठी विशेष अभियान राबविण्याचा निर्णय घेण्यात आला. जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित बैठकीत २५ ग्रामपंचायतींच्या सरपंचांशी थेट संवाद साधण्यात आला.
बैठकीत देण्यात आलेल्या महत्त्वाच्या सूचना:
स्थलांतरित व आधार नसलेल्या व्यक्तींची यादी तयार करणे.
भाबरी येथे नवीन पंचायत स्थापनेसह E-Office सुरु करणे.
राजबर्डी – रस्त्याचा विषय प्राधान्याने मार्गी लावणे.
तोरणमाळसारख्या ठिकाणी रेशन दुकानात मिनी बँक स्थापन करणे.
जल जीवन मिशन योजनेत संबंधित गावांचा समावेश करणे.
PESA अंतर्गत ग्रामसेवकांनी 15व्या वित्त आयोगाचा 60% निधी जल व स्वच्छता यावर खर्च करणे आवश्यक.
प्रत्येक गटात 100% शौचालय बांधणी.
प्रत्येक गावात एक वाचनालय स्थापन करणे.
सोलर मोटरद्वारे लांबच्या ठिकाणी पाणी पोहोचविणे – विहिरींची दुरुस्ती व बांधकाम.
CSR सहभाग:
ब्रिटानिया कंपनीच्या CSR अंतर्गत ग्रामविकास आराखडा तयार केला जाणार असून, गरोदर महिला, पोषण, आरोग्य, शेती प्रशिक्षण, बियाणे वाटप, उत्पादनवाढ यावर काम केले जाणार आहे. यावेळी ब्रिटानिया कंपनीचे प्रतिनिधी श्री. ओंकार घरत उपस्थित होते.
पुढील पावले:
प्रत्येक गावात एक पोलीस निरीक्षक निरीक्षणासाठी असणार
सामाजिक कार्य विभागाच्या विद्यार्थ्यांमार्फत गावांचा सर्वेक्षण
गावपातळीवर येणाऱ्या अडचणींवर ग्रामसेवक व सरपंचांशी संवाद
या अभियानाचे नेतृत्व मा. जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी आणि पोलीस अधीक्षक श्रवण दत्त यांच्याकडून करण्यात येत आहे. तहसीलदार श्री. ज्ञानेश्वर सपकाळे आणि गटविकास अधिकारी श्री. मनोज भोसले यांनीही सहभाग घेतला.
हे अभियान एकात्मिक विकासासाठी मैलाचा दगड ठरणार आहे.

#DevelopingNandurbar#AtidurgamVikas#DistrictAdministration#basicservices#CSR#Britannia#mitalisethi#nandurbarsmartcity















