
(नंदुरबार)
मौजे जयनगर येथे आज छत्रपती शिवाजी महाराज अभियानांतर्गत व पंतप्रधान मा. नरेंद्र मोदी यांच्या जन्मदिनी सुरू झालेल्या सेवा पंधरवाडा तसेच मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान अंतर्गत विशेष ग्रामसभा संपन्न झाली.
या ग्रामसभेचे उद्घाटन मा. आमदार श्री. विजयकुमार जी गावित (नंदुरबार विधानसभा) यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी, मा. तहसीलदार श्री. दीपक गिरासे (शहादा), गटविकास अधिकारी शहादा, तसेच जयनगर ग्रामपंचायतीचे सरपंच व उपसरपंच ईश्वर माळी उपस्थित होते.
ग्रामसभेत ठरलेले प्रमुख मुद्दे:
⦁ दारूबंदी आणि प्लॅस्टिक बंदी याबाबत ठराव मंजूर
⦁ महसूल सेवा पंधरवाडा संदर्भात माहिती दिली
⦁ टप्पा एक पानंद रस्ते व शिव रस्ते याबाबत मार्गदर्शन
⦁ शासनाच्या विविध योजना याबाबत अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे सविस्तर स्पष्टीकरण
ग्रामस्थांनी मोठ्या उत्साहात सहभाग नोंदवला असून या विशेष ग्रामसभेमुळे ग्रामविकास, जनजागृती आणि शासनाच्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी यांना नवे बळ मिळाले आहे.
#nandurbar#GramSabha#sevapakhwada#samruddhapanchayatraj#Vijaykumargavit#shahada#plasticfreevillage#darubandi