
नंदुरबार जिल्ह्यातील महसूल प्रशासन अधिक प्रभावी आणि पारदर्शक करण्याच्या उद्देशाने मा. उपविभागीय अधिकारी मा. अंजली शर्मा (IAS) यांनी नवापूर तालुक्यातील तलाठी कार्यालयांना भेट देऊन कामकाजाची सविस्तर पाहणी केली.
या दौऱ्यात मा. शर्मा यांनी तलाठी कार्यालयांमध्ये सुरू असलेल्या दैनंदिन कामकाजाचा आढावा घेतला तसेच नागरिकांना सेवा देण्याच्या प्रक्रियेत अधिक कार्यक्षमता आणि पारदर्शकता आणण्यासाठी आवश्यक त्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या. यावेळी मा. तहसीलदार दत्ता जाधव व इतर अधिकारी वर्ग उपस्थित होते.
#Nandurbar#RevenueDepartment#TalathiOffice#FieldInspection#SDMAnjaliSharma#GoodGovernance#PublicService#Administration#Navapur#CollectorOfficeNandurbar