नंदुरबार: महिला आर्थिक विकास महामंडळ, कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) व कृषी विभाग, नंदुरबार यांच्या संयुक्त विद्यमाने “तेजस्विनी कृषी संस्कृती प्रदर्शन” या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
सदर प्रदर्शनामध्ये महिला बचत गट व शेतकरी गट यांनी उत्पादित केलेल्या विविध वस्तू व पारंपरिक खाद्यपदार्थांचे भव्य प्रदर्शन व विक्री आयोजित करण्यात आली आहे. या उपक्रमाद्वारे स्थानिक उत्पादनांना प्रोत्साहन मिळून महिला सक्षमीकरण व ग्रामीण उद्योजकतेला चालना मिळणार आहे.
दिनांक: २० ते २३ मार्च २०२६
वेळ: सकाळी १०.०० ते रात्री १०.००
स्थळ: छत्रपती शिवाजी महाराज नाट्य मंदिर, नंदुरबार
कार्यक्रमांतर्गत विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले असून त्यामध्ये गळीत तृणधान्य कार्यशाळा, खरेदीदार-विक्रीते संमेलन, सांस्कृतिक कार्यक्रम, नादब्रह्म संगीत संध्या, तृतीयपंथी स्नेहसंमेलन, स्वयंसहाय्य गटातील महिलांचे फॅशन शो तसेच समारोप कार्यक्रम व पारितोषिक वितरण यांचा समावेश आहे.
जिल्ह्यातील नागरिकांनी या प्रदर्शनास मोठ्या संख्येने उपस्थित राहून महिला बचत गट व शेतकरी बांधवांना प्रोत्साहन द्यावे
#TejaswiniKrushiSanskruti#Nandurbar#WomenEmpowerment#SelfHelpGroup#SupportLocal#VocalForLocal#Farmers#LocalProducts#Maharashtra#Exhibition#CulturalEvent#RuralDevelopment
















