(नंदुरबार) जिल्हाधिकारी कार्यालयातील रंगावली सभागृहात मा. जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या अध्यक्षतेखाली ‘आदी कर्मयोगी’ अभियानाचे उद्घाटन व अभिमुखता कार्यक्रम पार पडला. हा उपक्रम भारत सरकारच्या जनजातीय कार्य मंत्रालयाने नुकताच सुरु केला आहे. कृषी अधिकारी उमेश भदाणे यांच्या समन्वयाने मा. जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, प्रांत अधिकारी व उपस्थित सर्व मान्यवरांनी दीप प्रज्वलित करून नंदुरबार जिल्ह्यात या उपक्रमाची औपचारिक सुरुवात करण्यात केली.
कार्यक्रमाची वैशिष्ट्ये:
⦁ स्टेट प्रोसेस लॅब, नाशिक येथून प्रशिक्षित होऊन आलेल्या विविध विभागांतील जिल्हा मास्टर ट्रेनर यांची ओळख करून देण्यात आली.
⦁ धरती आबा जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियान संदर्भात सहायक प्रकल्प अधिकारी देवेंद्र वाणी यांनी माहिती दिली.
⦁ नाशिक येथे २२ ते २५ ऑगस्ट दरम्यान झालेल्या प्रशिक्षणाचा आढावा प्रकल्प समन्वयक अमोल राठोड यांनी सादर केला.
आदी कर्मयोगी अभियानाचे उद्दिष्ट व दृष्टीकोन:
1. शासनाच्या विविध योजनांचा लाभ समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविणे.
2. सेवा, समर्पण आणि संकल्प या त्रिसूत्रीवर आधारित कार्यपद्धती.
3. योजनांमधील गॅप शोधून तो दूर करण्याचे नियोजन.
4. या अभियानाच्या माध्यमातून १ लाख आदिवासी गावांमध्ये सुमारे २० लाख आदीकर्मयोगी, आदीसहयोगी आणि आदीसाथी घडविण्याचा संकल्प.
5. केंद्र, राज्य, जिल्हा, तालुका व पंचायत स्तरावर विविध शासकीय यंत्रणांचे प्रतिसाद गट तयार करून योजनांचे कन्व्हर्जन करून एकात्मिक विकास साध्य करणे.
बैठकीतील चर्चा व निर्णय:
⦁ प्रत्येक स्तरावर एक नोडल अधिकारी नेमण्याचे ठरले.
⦁ तालुका मास्टर ट्रेनर ची नियुक्ती करून जिल्हा प्रोसेस लॅब गठीत करण्याच्या सूचना.
⦁ निवडलेल्या स्वयंसेवी संस्थांची भूमिका, त्यांचे करार आणि कामकाज निश्चित करण्यावर भर.
⦁ ग्राम कृती आराखडे तयार करण्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व यंत्रणांना सूचना दिल्या.
⦁ आदी सेवा केंद्र या महत्त्वाच्या घटकाबाबत सविस्तर चर्चा झाली.
⦁ अभियानाला मिशन मोडमध्ये राबविण्याचे ठरले.
मान्यवर उपस्थिती:
1. मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नमन गोयल
2. उपविभागीय अधिकारी नंदुरबार अंजली शर्मा
3. उपजिल्हाधिकारी (रोहयो) व जिल्हा पुरवठा अधिकारी महेश चौधरी
4. जिल्हा नियोजन अधिकारी शशांक काळे
5. विभागीय वन अधिकारी गुजर, सहा. वनसंरक्षक संजय साळुखे व संजय पवार
6. सहा. आयुक्त मत्स्यपालन किरण पाडवी
7. महिला व बालविकास कार्यक्रम अधिकारी कार्यालयाचे आय. एस. चव्हाण
8. गट विकास अधिकारी मनोज भोसले, ए. के. बिराडे, सहा. गट विकास अधिकारी तळोदा
9. विविध पंचायत समित्यांचे विस्तार अधिकारी, वनपरिक्षेत्र अधिकारी, प्रकल्प अधिकारी व अन्य अधिकारी
जिल्हा मास्टर ट्रेनर उपस्थिती:
देवेंद्र वाणी, योगेश बागल, कमलेश बागुल, अमोल राठोड, डॉ. स्वप्नील लोणकर, सागर गव्हंद, ज्ञानेश्वर केदार, डॉ. विशाल चौधरी, परमेश्वर गंडे आदी मास्टर ट्रेनर व अधिकारी कार्यक्रमास उपस्थित होते.
‘आदी कर्मयोगी’ अभियानाद्वारे नंदुरबार जिल्ह्यात आदिवासी भागातील सर्वांगीण विकासासाठी नवे नेतृत्व निर्माण होणार आहे. शासनाच्या योजनांचा लाभ खरोखरच जनतेपर्यंत पोहोचावा, यासाठी प्रशासनाने मिशन मोडमध्ये कार्य करण्याचे निर्धार या बैठकीत दर्शवला.

.#आदीकर्मयोगी#nandurbar#TribalDevelopment#जनजातीकार्य#missionmode#adikarmyogi#PanchayatiRaj#GovernmentofIndia