नवीन फौजदारी कायद्यांविषयी जनसामान्यांना माहिती व्हावी, याकरिता १९ ते २३ नोव्हेंबर २०२५ दरम्यान पाच दिवसीय प्रदर्शनाचे आयोजन आझाद मैदान येथे करण्यात आले आहे. हे प्रदर्शन सकाळी १० ते सायंकाळी ६ दरम्यान खुले असणार आहे.
प्रदर्शनामध्ये नवीन फौजदारी कायद्यांवर आधारित नियंत्रण कक्ष, न्याय सहाय्यक प्रयोगशाळा संचालनालय, न्याय वैद्यक व विष शास्त्र विभाग, अभियोग संचालनालय, नगर दिवाणी व सत्र न्यायालय, उच्च न्यायालय, मध्यवर्ती कारागृह यांचे स्टॉल्स आहेत. प्रदर्शनामध्ये प्रात्यक्षिकाद्वारे नाट्य रूपांतर पद्धतीने माहिती देण्यात आली आहे.
















