
यासाठी तलाठी, तहसीलदार, मंडळ अधिकारी यांनी जनसंवाद, लोकशाही दिन, लोकअदालत आदी माध्यमातून आणि विशेष शिबिरे आयोजित करुन नागरिकांपर्यंत पोहोचावे आणि त्यांच्या अडचणी सोडवाव्यात, असे निर्देश महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले.
अहिल्यानगर जिल्ह्यातील महसूल विभागाशी संबंधित कामांचा आढावा मंत्री श्री.बावनकुळे यांनी मंत्रालयात झालेल्या बैठकीत घेतला. यावेळी मंत्रालयातील अधिकाऱ्यांसह अहिल्यानगर जिल्ह्यातील महसूल अधिकारी दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते.















