
या दृष्टीने सहकार विभागाने सुयोग्य नियोजन करावे व त्यानुसर कार्यवाही करावी, अशा सूचना सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी दिल्या.
सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्या अध्यक्षतेखाली साखर भवन येथे सहकार विभागाची आढावा बैठक झाली. बैठकीस सहकार राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर, अपर मुख्य सचिव राजगोपाल देवरा, सहकार आयुक्त दीपक तावरे,अपर आयुक्त श्रीकृष्ण वाडेकर, संतोष पाटील यांच्यासह सहकार विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.