Home महाराष्ट्र पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग व राज्य हवामान कृती कक्षाने ‘मुंबई क्लायमेट...

पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग व राज्य हवामान कृती कक्षाने ‘मुंबई क्लायमेट वीक २०२६’दरम्यान दोन महत्त्वाच्या सामंजस्य करारांवर मंत्री पंकजा मुंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत स्वाक्षरी करण्यात आली.

0
The Department of Environment and Climate Change and the State Climate Action Cell signed two important MoUs during the 'Mumbai Climate Week 2026' in the presence of Minister Pankaja Munde.

राज्य हवामान कृती कक्षाने क्लायमेट ट्रेड एलएलपी सोबत आणि पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाने हिंदुस्थान कोकाकोला बेव्हरेज कंपनीसोबत महा-आरईपीटी अभियान राबविण्यासंदर्भात करार केला. पीईटी बाटल्यांचे संकलन व पुनर्वापरासाठी पहिल्यांदाच देशात कोकाकोला कंपनीने राज्य शासनासोबत सामंजस्य करार केला आहे.

यावेळी पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाच्या सचिव जयश्री भोज, वातावरणीय बदल कक्षाचे संचालक अभिजित घोरपडे यांनी या करारांवर स्वाक्षरी केल्या.

मुंबईक्लायमेटवीक मध्ये राज्य हवामान कृती कक्षाने दोन महत्त्वाचे अहवालही प्रसिद्ध केले. सी ४० सिटीज यांच्या सहकार्याने तयार करण्यात आलेल्या सी४० अहवाल : महाराष्ट्रातील शहरांतील ऊर्जा आणि बांधकाम क्षेत्रातील नेट झिरो संक्रमण या अहवालात महाराष्ट्रातील शहरांसाठी नेट-झिरो आणि हवामान-प्रतिरोधक विकासाचा रोडमॅप मांडण्यात आला आहे. मुंबई, अमरावती आणि ठाणे यांसह सात शहरांनी उच्च प्रभावी कृती आराखडे तयार केले असून, त्यात महानगरपालिका इमारती नेट-झिरो करणे आणि छतावरील सौरऊर्जा वाढवण्यावर भर देण्यात आला आहे.

#MumbaiClimateWeek