
सेवा, पारदर्शकता आणि उत्तरदायित्व या त्रिसूत्रीचा अवलंब करुन विभागाचे काम अधिक प्रभावीपणे करण्याचे निर्देश अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री धनंजय मुंडे यांनी दिले.
मुंबईत सह्याद्री अतिथीगृह येथे अन्न व नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण विभागाच्या कामकाजाचा सविस्तर आढावा मंत्री श्री. मुंडे यांनी घेतला. स्मार्ट शिधापत्रिका आणि आधुनिक गोदाम व्यवस्था याला प्राथमिकता देणार असल्याचेही मंत्री श्री. मुंडे यांनी यावेळी सांगितले.















