Home महाराष्ट्र टाटा, एमआयडीसी व रोहा नगर परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने रोहा येथील टाटा...

टाटा, एमआयडीसी व रोहा नगर परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने रोहा येथील टाटा संचलित कौशल्यवर्धन केंद्राचे भूमीपूजन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते झाले.

2
The groundbreaking ceremony of the Tata-run Skill Development Center in Roha, jointly organized by #Tata, #MIDC and Roha Municipal Council, was held by Deputy Chief Minister Ajit Pawar.

राज्य शासन व टाटा समूह उद्योग यांच्यावतीने रोहा येथे कौशल्यवर्धन केंद्र शिक्षणाचे नवे दालन उभारण्यात येत आहे. हा अतिशय महत्त्वाकांक्षी प्रकल्प असून मे २०२६ पर्यंत हे काम पूर्ण करण्यात येईल. आजच्या घडीला जवळपास सर्वच क्षेत्रात AI चा वापर मोठ्या प्रमाणावर होत आहे. त्यामुळे अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करणं आगामी काळात आवश्यक ठरणार आहे. या केंद्रातून मिळणाऱ्या प्रशिक्षणाचा लाभ जिल्ह्यातील विद्यार्थी-विद्यार्थींनींनी तसेच उद्योग व्यावसायिकांनी लाभ घ्यावा- उपमुख्यमंत्री अजित पवार

यावेळी महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे, खासदार सुनील तटकरे,माजी आमदार अनिकेत तटकरे, माणगाव शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष ॲड.राजीव साबळे, मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले, जिल्हा पोलीस अधीक्षक आचल दलाल, अपर जिल्हाधिकारी सुनिल थोरवे, जिल्हा शल्य चिकित्सक निशिकांत पाटील, सुशिल कुमार जागतिक प्रमुख शासकीय प्रकल्प आणि कौशल्य विकास टाटा टेक्नॉलॉजी लि.पुणे, प्रितम गंजेवार, प्रकल्प समन्वय टाटा टेक्नॉलॉजी लि.पुणे आदि उपस्थित होते.