
आंतरराष्ट्रीय सायकल स्पर्धा म्हणून मर्यादित न राहता पुढील पिढ्यांसाठी टिकून राहणारा पायाभूत आणि क्रीडा वारसा ठरणार असल्याचा विश्वास मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला.
यावेळी केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, सामजिक न्याय राज्य मंत्री माधुरी मिसाळ, सायकलिंग फेडरेशन ऑफ इंडियाचे महासचिव दातो मनिंदर पाल सिंग मंचावर उपस्थित होते.
पुणे हे सांस्कृतिक राजधानीबरोबरच तंत्रज्ञान, मॅन्युफॅक्चरिंग आणि आयटी क्षेत्रातील अग्रगण्य शहर असून पश्चिम घाटाचे निसर्गसौंदर्य स्पर्धेला वैशिष्ट्यपूर्ण उंची देईल. ही स्पर्धा लवकरच जागतिक क्रीडा कॅलेंडरमधील प्रतिष्ठेची वार्षिक स्पर्धा बनेल. या माध्यमातून पुणे जिल्हा क्रीडा व पर्यटन क्षेत्रात आंतरराष्ट्रीय नकाशावर ठळकपणे येईल. स्पर्धेसोबत विविध पूरक उपक्रम राबवण्यात येणार असून, पर्यटकांना निसर्गासोबतच छत्रपती शिवाजी महाराजांच्या ऐतिहासिक किल्ल्यांचे दर्शन घेण्याची संधी मिळणार आहे. अत्यंत कमी कालावधीत आंतरराष्ट्रीय मानकांनुसार स्पर्धेची तयारी पूर्ण करणे हे उल्लेखनीय असून ४३७ किलोमीटर लांबीचे रस्ते जागतिक दर्जाच्या सायकलिंग स्पर्धेस अनुरूप विकसित केले आहेत. ‘यूसीआय’च्या इतिहासात मैलाचा दगड ठरेल, अशा रितीने ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी महाराष्ट्र शासन सर्वतोपरी सहकार्य करेल – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
कार्यक्रमास खासदार प्रा. मेधा कुलकर्णी, आमदार उमा खापरे, अमित गोरखे, राहुल कुल, महेश लांडगे, चेतन तुपे, हेमंत रासने, शंकर जगताप, पुणे विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, महाराष्ट्र मेट्रोरेल कॉर्पोरेशन लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर, राज्याच्या क्रीडा आयुक्त शीतल तेली-उगले, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, पुणे महानगरपालिका आयुक्त नवल किशोर राम, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील, पुणे शहर पोलीस आयुक्त अमितेशकुमार कुमार, पिंपरी चिंचवड शहरचे पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे आदी उपस्थित होते.
#Maharashtra#PuneGrandTour#InternationalCyclingGrandTour2026















