
कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयातील शिक्षकांचे मानधन नियोजन विभागामार्फत अदा करण्यात येते. हे मानधन दिवाळीपूर्वी अदा करण्यात यावे, असे आदेश शालेय शिक्षण राज्यमंत्री डॉ पंकज भोयर यांनी दिले. तसेच, राज्य शासनाच्या कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय योजनेंतर्गत असलेल्या शाळा आदर्श करण्याचेही त्यांनी सूचित केले.
कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय योजनेंतर्गत कार्यरत शिक्षकांच्या प्रश्नांबाबत मंत्रालयात आयोजित बैठकीला आमदार मनीषा कायंदे, समग्र शिक्षण राज्य प्रकल्पाचे संचालक संजय यादव, शालेय शिक्षण विभागाचे उपसचिव तुषार महाजन, उपसंचालक राजेश कंकाळ, नियोजन विभागाचे उपसचिव मनीषा राणे उपस्थित होते.