Home महाराष्ट्र क्रांतीसुर्य महात्मा फुले आणि ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या विचारांचा वारसा त्यांच्या एकत्रित...

क्रांतीसुर्य महात्मा फुले आणि ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या विचारांचा वारसा त्यांच्या एकत्रित साहित्याच्या माध्यमातून नव्या पिढीपर्यंत जाईल.

4
The legacy of the thoughts of Krantisurya Mahatma Phule and Gyanjyoti Savitribai Phule will be passed on to the new generation through their collective literature.

या साहित्यामुळे नवीन पिढीला प्रेरणादायी दिशा मिळून यशस्वी होण्याचा मार्ग मिळेल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महात्मा जोतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या समग्र वाड्मयाचे प्रकाशन कार्यक्रमात व्यक्त केला.

मंत्रालयात आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते समग्र वाड्मयाचे प्रकाशन आणि इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या नव्या संकेतस्थळाचे उद्घाटनही करण्यात आले. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे, मंत्रिमंडळातील अन्य मंत्रीगण तसेच विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

इतर मागास बहुजन कल्याण विभागांतर्गत कार्यरत #महाज्योती संस्थेमार्फत निर्मित या समग्र वाड्मयामध्ये महात्मा फुले यांचे २३ आणि सावित्रीबाई फुले यांचे १४ ग्रंथ, त्यांचा पत्रव्यवहार तसेच महत्त्वपूर्ण दस्तऐवजांचा समावेश आहे. पुण्यातील महात्मा फुले वाडा आणि साताऱ्यातील नायगाव येथील सावित्रीबाईंच्या शिल्पसृष्टीची रंगीत छायाचित्रे हे या ग्रंथाचे वैशिष्ट्य आहे.

#महात्माफुले

#सावित्रीबाईफुले