
संविधानाच्या अनुच्छेद ३२० अंतर्गत सोपविण्यात आलेली कर्तव्ये आणि जबाबदाऱ्या पार पाडण्यासाठी या आयोगाची रचना करण्यात आली आहे. या तरतुदींनुसार, आयोग राज्य शासनाच्या अंतर्गत येणाऱ्या विविध पदांसाठी योग्य उमेदवारांची शिफारस करतो. तसेच, भरतीचे नियम तयार करणे, पदोन्नती, बदल्या आणि शिस्तभंगाची कारवाई यांसारख्या सेवाविषयक विविध बाबींवर शासनाला आवश्यक तो सल्ला देतो.
राज्य शासनाच्या सेवेतील पदांवरील भरतीकरिता महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत विविध परीक्षांचे आयोजन केले जाते. आयोगाकडून सर्व परीक्षांचे कामकाज कुशलतेने व पारदर्शकरित्या हाताळले जाते. तसेच, आयोगाचे कामकाज पारदर्शक आणि निष्पक्ष असल्याने विद्यार्थ्यांकडून आयोगातर्फे सर्व परीक्षा घेण्यात याव्यात, अशी मागणी करण्यात आली आहे. शासनानेदेखील आयोगावर विश्वास दाखविला असून, त्यानुसार राज्य शासनातील गट-अ, गट-ब व गट-क संवर्गातील पदभरती आयोगाकडे सोपविण्यात आली आहे.
सविस्तर वृत्त- https://mahasamvad.in/207244/















