Home सरकारी योजना नागपूर महापालिकेच्यावतीने राबविण्यात येत असलेल्या महर्षी सुदर्शन वाल्मिकी वसाहत आणि प्रधानमंत्री आवास...

नागपूर महापालिकेच्यावतीने राबविण्यात येत असलेल्या महर्षी सुदर्शन वाल्मिकी वसाहत आणि प्रधानमंत्री आवास योजना

1
The Maharshi Sudarshan Valmiki Colony and Pradhan Mantri Awas Yojana being implemented by the Nagpur Municipal Corporation.

अंतर्गत सफाई कर्मचाऱ्यांसाठी ‘स्वप्नपूर्ती’ या सदनिका प्रकल्पाचे भूमिपूजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय परिवहन व रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले.

सफाई कर्मचाऱ्यांसह समाजातील प्रत्येक घटकाच्या आर्थिक, सामाजिक उन्नतीसाठी राज्य शासन, महापालिका कटिबद्ध आहे. महानगराच्या वाढत्या गरजा व आव्हाने लक्षात घेता लवकरच लाड-पागे समितीच्या शिफारसींनुसार सुमारे ५०० लोकांना नियुक्तीचे आदेश निर्गमित केले जात असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

महर्षी सुदर्शन वाल्मिकी यांच्या नावाने सफाई कर्मचाऱ्यांसाठी ही वसाहत उभी होणार आहे. वसाहतीच्या कामात कोणतीही कमतरता राहू नये याची दक्षता घेण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अधिकाऱ्यांना दिले. गरिबांच्या घराच्या स्वप्नपूर्तीसाठी प्रधानमंत्री आवास योजना ही अत्यंत महत्त्वाची अशी योजना आहे. आगामी काळात सर्व विधानसभा क्षेत्रांत या योजनेची अंमलबजावणी होणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

सुदर्शन वाल्मिकी समाजाचे जीवनमान उंचावण्याच्या दृष्टीने महानगरपालिकेचा हा प्रकल्प अत्यंत स्तुत्य आहे. या दोन्ही प्रकल्पांच्या माध्यमातून आठशे ते नऊशे कुटुंबांना हक्काची घरे मिळणार असून राज्य शासनाने त्याकडे विशेष लक्ष दिले असल्याचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले. समाजाने आता आधुनिक काळाच्या गरजा लक्षात घेऊन हॉस्पिटॅलिटीच्या क्षेत्रात पदार्पण करावे, छोट्या-छोट्या कंपन्या सुरु करून सेवा पुरवाव्या आणि रोजगारांची निर्मितीही करावी, असे आवाहनही श्री. गडकरी यांनी यावेळी केले.

कार्यक्रमास पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, राज्यमंत्री ॲड्. आशीष जयस्वाल, महापौर निता ठाकरे, सफाई कर्मचारी आयोगाचे अध्यक्ष शेरसिंह डागोर यांच्यासह अन्य वरिष्ठ अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

#प्रधानमंत्रीआवासयोजना

#PMAY

#Swapnapurti#HousingForAll

#NagpurMunicipalCorporation