Home आरोग्य रुग्ण-केंद्रित सेवा अधिक प्रभावी बनवण्याची आवश्यकता – पल्स परिषदेतील चर्चासत्रातील सूर

रुग्ण-केंद्रित सेवा अधिक प्रभावी बनवण्याची आवश्यकता – पल्स परिषदेतील चर्चासत्रातील सूर

0
The need to make patient-centered services more effective – Themes from a panel discussion at the Pulse Conference

मुंबई : एकात्मिक (Integrated) आरोग्यसेवा हीच भविष्यातील दिशा आहे.  वैद्यकीय शिक्षणात मानसिक, सामाजिक आणि तांत्रिक घटकांचा समन्वय साधून रुग्ण-केंद्रित सेवा अधिक प्रभावी बनवण्यावर भर देण्यात यावा असे मत तज्ञांनी व्यक्त केले.

बीकेसीतील जिओ कनव्हेंशन सेंटर येथे आयोजित  ‘पल्स परिषदेतील  “The Future is Integrated Care – Strengthening Medical Education for Comprehensive, Patient-Centred Practice” या विषयावर आयोजित  चर्चासत्रात विविध क्षेत्रातील तज्ज्ञांनी आरोग्यसेवेतील एकात्मिक दृष्टिकोनाची गरज अधोरेखित केली. यावेळी वैद्यकीय शिक्षण, मानसिक आरोग्य, आणि रुग्ण-केंद्रित सेवा यावर महत्त्वपूर्ण विचार मांडण्यात आले.

यावेळी वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्यासह इतर मान्यवर,तज्ञ, उपस्थित होते. यासोबतच त्यांनी समाजजागृतीचे महत्त्व अधोरेखित केले. आरोग्यसेवा ही केवळ हॉस्पिटलपुरती मर्यादित न राहता समाजाच्या प्रत्येक स्तरापर्यंत पोहोचली पाहिजे. लोकांमध्ये आरोग्याबाबत जागरूकता निर्माण करणे, प्रतिबंधात्मक उपायांवर भर देणे आणि मानसिक आरोग्याविषयी खुली चर्चा घडवून आणणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. भविष्यातील डॉक्टर हे केवळ तज्ज्ञ नसून संवेदनशील मार्गदर्शक (empathetic caregivers) असायला हवेत. “आपण कितीही प्रगत तंत्रज्ञान वापरले, तरी शेवटी रुग्णाला बरे करणारा घटक म्हणजे डॉक्टरांचा विश्वास, सहानुभूती आणि समजूतदारपणा,” असे त्यांनी  सांगितले.