Home महाराष्ट्र प्रख्यात मानसोपचारतज्ज्ञ, विचारवंत आणि लेखक डॉ. आनंद नाडकर्णी यांच्या निधनाने मानसिक आरोग्य...

प्रख्यात मानसोपचारतज्ज्ञ, विचारवंत आणि लेखक डॉ. आनंद नाडकर्णी यांच्या निधनाने मानसिक आरोग्य क्षेत्रात संवेदनशीलतेने आणि समर्पित भावनेने कार्य करणारे व्यक्तिमत्व गमावले आहे

1
The passing away of renowned psychiatrist, thinker and writer Dr. Anand Nadkarni has left a person who worked with sensitivity and dedication in the field of mental health.

अशा शब्दात उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी आपल्या शोकभावना व्यक्त करत डॉ. नाडकर्णी यांना श्रद्धांजली वाहिली आहे.डॉ. आनंद नाडकर्णी यांनी केवळ एक मानसोपचारतज्ज्ञ म्हणूनच नव्हे, तर एक प्रख्यात लेखक, कवी, नाटककार आणि विचारवंत म्हणून हजारो तरुणांच्या आणि नागरिकांच्या आयुष्याला सकारात्मक दिशा दिली. त्यांनी स्थापन केलेल्या ‘इन्स्टिट्यूट फॉर सायकॉलॉजिकल हेल्थ’ आणि ‘मुक्तांगण’ व्यसनमुक्ती केंद्रातील त्यांचे योगदान येणाऱ्या पिढ्यांसाठी कायम प्रेरणादायी राहील. त्यांच्या निधनाने वैद्यकीय, सामाजिक आणि साहित्य क्षेत्रातील एक मार्गदर्शक हरपला आहे, असेही उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटले आहे.

#आनंदनाडकर्णी