
संपूर्ण तालविश्वाचाच ताल चुकवणारे आहे, भारतीय शास्त्रीय संगीत क्षेत्राचे हे नुकसान कधीही भरुन येणारे नाही. उस्ताद झाकीर हुसेन यांच्या तबला आणि डग्ग्याच्या जोडीत जणू नादब्रह्म सामावले होते, अशा शब्दात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उस्ताद झाकीर हुसेन यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे.















