Home महाराष्ट्र दुसऱ्या उत्पादन साखळीचा शुभारंभ देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते...

दुसऱ्या उत्पादन साखळीचा शुभारंभ देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते करण्यात आला.

3
The second production line was inaugurated by the country's Defense Minister Rajnath Singh.

जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, एचएएलचे चेअरमन आणि व्यवस्थापकीय संचालक डॉ. डी. के. सुनील, संरक्षण उत्पादन विभागाचे सचिव संजीवकुमार आदी उपस्थित होते.

नाशिकची भूमी अध्यात्मिकतेबरोबरच आत्मनिर्भरतेचे प्रतिक असून देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या स्वप्नातील भारत आत्मनिर्भर होऊन बलशाली होण्यासाठी या भूमीतील हिंदुस्थान एरॉनॉटिक्स लिमिटेड (एचएएल) या प्रकल्पाची महत्वाची भूमिका आहे, असे प्रतिपादन देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी केले. तसेच एचएएलच्या ओझर प्रकल्पात मिग, सुखोई ३०, तेजस आणि प्रशिक्षणार्थी विमानांची निर्मिती होऊन त्यांनी अवकाशात घेतलेले उड्डाण हे देश आणि संरक्षण विभागासाठी अभिमानाची बाब आहे. हे केवळ गौरवाचे उड्डाण नसून आत्मनिर्भर भारताचे उड्डाण आहे, असेही संरक्षण मंत्री श्री. सिंग यांनी यावेळी सांगितले.