Home नंदुरबार जिल्हा नायलॉन मांजा वापरावर राज्य शासनाने तसेच नंदुरबार जिल्हा पोलीस दलाने कडक बंदी...

नायलॉन मांजा वापरावर राज्य शासनाने तसेच नंदुरबार जिल्हा पोलीस दलाने कडक बंदी घातली आहे.

2
The state government and the Nandurbar District Police Force have strictly banned the use of nylon nets.

नायलॉन मांजा हा अत्यंत तीक्ष्ण, मजबूत व धोकादायक असल्यामुळे गेल्या काही वर्षांत पक्षी, जनावरे तसेच सर्वसामान्य नागरिकांचे जीवितास गंभीर धोका निर्माण झाल्याची अनेक प्रकरणे आढळली आहेत.

नायलॉन मांजामुळे —

🕊️ पक्ष्यांचे पंख कापले जाऊन त्यांचा मृत्यू होतो

🚶‍♂️ दोनचाकी वाहनस्वारांचे प्राण धोक्यात येतात

👶 लहान मुले व नागरिकांना खोल जखमा होतात

🌳 झाडे, विद्युत तारांमध्ये अडकून दुर्घटना घडतात

🎯 नंदुरबार जिल्हा पोलीस दल सर्व नागरिकांना आवाहन करते की:

⛔ बेकायदेशीर नायलॉन/चायनीज मांजा विक्री, वापर किंवा साठा करू नये

⛔ बंदी असलेल्या मांजाचा वापर आढळल्यास त्वरित 112 किंवा जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये कळवावे

✅ पारंपरिक, पर्यावरणपूरक मांजाचाच वापर करून सुरक्षित व आनंदी संक्रांत साजरी करावी

📌 कायद्याची अंमलबजावणी:

नायलॉन मांजा वापर/विक्री हा दंडनीय गुन्हा असून दोषींवर कायद्यानुसार कठोर कारवाई करण्यात येईल. नागरिकांच्या सहकार्यानेच आपला जिल्हा सुरक्षित होऊ शकतो.

🙏 आपला छोटा निर्णय… कुणाचे तरी मोठे आयुष्य वाचवू शकतो.

🕊️ पक्षी वाचवा – जीव वाचवा.

#dgpmaharashtra

@ShravanDathS