Home महाराष्ट्र मॅग्नेट-२.० प्रकल्पाच्या माध्यमातून राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांचा सर्वांगीण विकास करून त्यांना आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील.

मॅग्नेट-२.० प्रकल्पाच्या माध्यमातून राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांचा सर्वांगीण विकास करून त्यांना आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील.

0
मॅग्नेट-२.० प्रकल्पाच्या माध्यमातून राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांचा सर्वांगीण विकास करून त्यांना आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील.
Through the Magnet-2.0 project, the comprehensive development of the state's Agricultural Produce Market Committees will be undertaken, and international-standard facilities will be made available to them.

जागतिक बाजारपेठांमध्ये उपलब्ध असलेल्या आधुनिक सुविधा राज्यातील बाजार व्यवस्थेत निर्माण करण्यात येणार असून, महाराष्ट्रात काढणीपश्चात सुविधांनी युक्त मेगा क्लस्टर्स विकसित करण्याचे उद्दिष्ट असल्याचे पणन व राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांनी महाराष्ट्र ॲग्रिबिझनेस नेटवर्क (मॅग्नेट-२.०) प्रकल्पासाठी मॅपिंग स्टडी व संपूर्ण प्रकल्प आराखडा अंतिम करण्याबाबत आयोजित बैठकीत सांगितले.

आशियाई विकास बँकेच्या शिफारशींनुसार मॅग्नेट प्रकल्पाचा विस्तार करण्यात येत असून, मॅग्नेट-२.० साठी २,४०२ कोटी इतक्या निधीचा आराखडा तयार करण्यात आला आहे. राज्य मंत्रिमंडळाने या अतिरिक्त निधीस मान्यता दिली असून, प्रकल्पाला नीती आयोगाची मंजुरी प्राप्त झाली आहे. सध्या कृषी व शेतकरी कल्याण विभागाकडून (डिओएएफ ) प्राथमिक प्रकल्प अहवाल (पीपीआर) अंतिम मंजुरीच्या प्रक्रियेत असल्याचे पणन मंत्री रावल यांनी यावेळी सांगितले.

बैठकीस सहकार व पणन विभागाचे प्रधान सचिव प्रवीण दराडे, सहसचिव विजय लहाने, महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाचे कार्यकारी संचालक संजय कदम, मॅग्नेट प्रकल्प संचालक विनायक कोकरे, अतिरिक्त प्रकल्प संचालक डॉ. अमोल यादव तसेच प्रकल्पाचे सल्लागार व अन्य अधिकारी उपस्थित होते.

#मॅग्नेट२

#कृषीउत्पन्नबाजारसमिती

#APMC

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here