
महाराष्ट्राचा’ हा उपक्रम राबवण्याचा निर्णय उच्च व तंत्रशिक्षण विभागाने घेतला आहे. दरवर्षी हा उपक्रम राबविण्यात येणार आहे.
राज्य मध्यवर्ती ग्रंथालय, मुंबई येथे शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थी, ग्रंथालयातील वाचक यांना त्यांच्या आवडीनुसार पुस्तके वाचन करण्याचा सामूहिक उपक्रम, विद्यार्थ्यांसाठी पुस्तक परीक्षण व पुस्तक कथन स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच मुंबई शहरातील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची ग्रंथालय भेट व सामूहिक ग्रंथ वाचन कार्यक्रम, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी वाचन कौशल्य कार्यशाळा, विद्यार्थी – लेखक परीसंवाद अशा कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
विद्यार्थ्यांनी या उपक्रमात सहभागी होऊन वाचनसंस्कृती वाढवावी, असे आवाहन राज्य मध्यवर्ती ग्रंथालयाच्या ग्रंथपाल शालिनी इंगोले यांनी केले आहे.















