Home महाराष्ट्र सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभागाच्या वतीने आज गेट ऑफ इंडिया ते...

सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभागाच्या वतीने आज गेट ऑफ इंडिया ते यशवंतराव चव्हाण सेंटरपर्यंत व्यसनमुक्ती दिंडी काढण्यात आली.

0
Today, on behalf of the Department of Social Justice and Special Assistance, an anti-addiction march was taken out from Gate of India to Yashwantrao Chavan Center.

सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी गेटवे ऑफ इंडिया येथे या दिंडीला हिरवा झेंडा दाखवला. यावेळी सामाजिक न्याय विभागाचे प्रधान सचिव हर्षदीप कांबळे, उपायुक्त बाळासाहेब सोळंकी, स्मिता अंबावडेकर आदी उपस्थित होते.

नवी पिढी ही देशाची संपत्ती आहे. मात्र, काही तरुण व्यसनामध्ये गुंतले आहेत, त्यांना बरबाद होण्यापासून वाचविण्यासाठी लोकसहभाग महत्वाचा आहे. यासाठी राज्यभर लोकचळवळ उभी करून महाराष्ट्र व्यसनमुक्त करूया, असे आवाहन मंत्री शिरसाट यांनी केले