अशा वेळी ट्रॅफिक पोलीस शाळेसमोरील रस्त्यावर वाहतुकीचे नियंत्रण ठेवतात. काही वेळा पावसात, उन्हात किंवा गर्दीतही हे पोलीस अधिकारी विद्यार्थ्यांना हात पकडून सुरक्षितरित्या रस्ता पार करून देतात. या सहकार्यामुळे विद्यार्थी आणि पालकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण होते.
ट्रॅफिक पोलीसांचे हे केवळ एक कर्तव्य नसून, एक सामाजिक बांधिलकी देखील आहे.
















