Home नंदुरबार केवडीपाडा (हरिपूर) ते सुतारपाडा मार्गावरील पुलावरील वाहतूक तात्पुरती बंद

केवडीपाडा (हरिपूर) ते सुतारपाडा मार्गावरील पुलावरील वाहतूक तात्पुरती बंद

2
Traffic on the bridge on the Kevadipada (Haripur) to Sutarpada route temporarily closed

(नंदुरबार) जिल्ह्यातील सार्वजनिक बांधकाम विभागाअंतर्गत प्रजिमा-२२ रस्त्यावरील केवडीपाडा (हरिपूर) ते सुतारपाडा या दरम्यान असलेला पुल अलीकडील अतिवृष्टीमुळे गंभीररीत्या बाधित झाला आहे. पुलाच्या संरचनेला हानी पोहोचल्यामुळे नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने मा. जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांनी या पुलावरून होणारी सर्व प्रकारची वाहन वाहतूक तात्पुरती बंद करण्याचे आदेश दिले आहेत.

सदर कालावधीत वाहतुकीसाठी खालील पर्यायी मार्ग वळवण्यात आला आहे: 👇

➡ आष्टे – घोगळपाडा – अजयपूर – केवडीपाडा (हरिपूर)

जिल्हा पोलीस अधीक्षक, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या यंत्रणेमार्फत या मार्गावर दिशा दर्शक फलक व बॅरेगेट्स लावण्यात येत आहेत. नागरिकांना वाहतूक मार्गदर्शन आणि सुरक्षेसाठी आवश्यक ती पथके नेमण्यात येणार आहेत.

सार्वजनिक बांधकाम विभागाने या पुलाचे दुरुस्तीचे काम लवकरात लवकर पूर्ण करून वाहतूक पुन्हा सुरु करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत.

🛑 महत्वाचे आवाहन:

नागरिकांनी वाहतुकीदरम्यान दिलेल्या दिशादर्शक सूचना पाळाव्यात. बंद मार्गावरून प्रवास टाळून पर्यायी मार्गांचा वापर करावा, जेणेकरून अपघात किंवा अडचणी टाळता येतील.

#nandurbar#collectorofficenandurbar#publicsafety#pwdnandurbar#TrafficUpdate#MonsoonAlert#roadsafety#nandurbarnews#DistrictAdministration#PublicNotice