कृषी विभाग, नंदुरबार यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, नंदुरबार व कृषी विकास अधिकारी, नंदुरबार यांच्या उपस्थितीत आज शहादा व अक्राणी तालुक्यातील कृषी निविष्ठा विक्रेत्यांचे रब्बी हंगामपूर्व व ‘साथी पोर्टल’ वरील बियाणे विक्री संदर्भात कृषी निविष्ठा विक्रेत्यांचे प्रशिक्षण तालुका कृषी अधिकारी कार्यालय, शहादा येथे घेण्यात आले.
या प्रशिक्षणामध्ये उपविभागीय कृषी अधिकारी श्री. के. एस. वसावे, मोहिम अधिकारी श्री. सचिन देवरे आणि जिल्हा गुण नियंत्रण निरीक्षक श्री. स्वप्नील शेळके हे मान्यवर उपस्थित होते.
मुख्य वैशिष्ट्ये:
– रब्बी हंगामपूर्व विक्रेत्यांचे प्रत्यक्ष प्रशिक्षण
– ‘साथी पोर्टल’वरील बियाणे विक्री प्रक्रियेचे मार्गदर्शन
– EPOS आणि खत विक्रीविषयी सूचना
– कृषी विभागाकडून विक्रेत्यांना डिजिटल सक्षमीकरणाची दिशा
प्रशिक्षणादरम्यान मोहिम अधिकारी श्री. देवरे यांनी ‘साथी पोर्टल’चा सविस्तर आढावा घेत विक्रेत्यांना पोर्टलवर बियाण्याची खरेदी-विक्री प्रक्रिया, रिटर्न स्टॉक नोंदणी, तसेच बियाण्याचा स्टॉक रिसीव करण्याची पद्धत याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. श्री. स्वप्नील शेळके यांनी EPoS यंत्रणा, खत विक्री प्रक्रियेतील काळजीचे मुद्दे, तसेच गुणवत्ता नियंत्रणाच्या बाबतीत बहुमूल्य सूचना दिल्या.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक कृषी अधिकारी श्री. विशाल वाकचौरे (शहादा) यांनी केले. तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन कृषी अधिकारी श्री. सौरभ धुमाळ (अक्राणी) यांनी केले.
या प्रशिक्षणास शहादा व अक्राणी तालुक्यातील सर्व बियाणे विक्रेत्यांचा उत्स्फूर्त सहभाग लाभला. प्रशिक्षणाच्या माध्यमातून विक्रेत्यांना रब्बी हंगामातील बियाणे विक्री प्रक्रियेत पारदर्शकता, अचूकता आणि जबाबदारी या तिन्ही मूल्यांचा अंगीकार करण्याचे आवाहन करण्यात आले.
#NandurbarAgriculture#KisanSuvidha#RabiTraining#SathiPortal#SeedDistribution#AgricultureAwareness