SBI RSETI Nandurbar येथे परिवर्तनात्मक प्रवास आणि अनुकरणीय उत्तम पद्धती समजून घेण्याच्या उद्देशाने मा. जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी व RSETI संचालक श्री. गणेश पाठारे यांच्या मार्गदर्शनाखाली अध्ययन भेट यशस्वीपणे आयोजित करण्यात आली. या कार्यक्रमात जिल्हा व्यवस्थापक (Financial Inclusion) यांसह एकूण ४९ जणांनी सहभाग घेतला.
कार्यक्रमास Vikas Gupta, उपमहाव्यवस्थापक, एसबीआय तसेच Naresh Kumar, सहाय्यक महाव्यवस्थापक यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
परिसर भेट व औपचारिक सत्र:
कार्यक्रमाची सुरुवात संपूर्ण आरसेटी परिसराच्या भेटीने झाली. सहभागी अधिकाऱ्यांनी इमारत व पायाभूत सुविधा, वसतिगृह व्यवस्था, प्रशिक्षण पद्धती, नोंदवही व दस्तऐवजीकरण प्रणाली तसेच एकूण व्यवस्थापनाचा आढावा घेतला.
यानंतर वर्गखोलीत औपचारिक सत्र पार पडले. आरसेटीचे संचालक श्री. गणेश पाठारे यांनी उपस्थित मान्यवर व सहभागींचे स्वागत केले. श्री. सुनील कस्तुरे यांनी अध्ययन भेटीचा उद्देश स्पष्ट करताना यशस्वी मॉडेलमधून शिकून ते इतर आरसेटींमध्ये कसे अमलात आणता येईल यावर भर दिला. भारती यांनी एसबीआय आरसेटी नंदुरबारच्या विकासकामे व कामगिरीचे सादरीकरण केले. नियोजनबद्ध कार्यपद्धती, शिस्त आणि प्रभावी समन्वयामुळे सातत्यपूर्ण यश मिळाल्याचे त्यांनी नमूद केले.
परिवर्तनात्मक कार्याचे कौतुक:
आपल्या मनोगतात श्री. विकास गुप्ता यांनी आरसेटी टीमच्या परिवर्तनात्मक कार्याचे कौतुक केले. ग्रामीण उद्योजकतेला चालना देण्याच्या या कार्यासाठी एसबीआयकडून सातत्यपूर्ण सहकार्य राहील, अशी त्यांनी ग्वाही दिली.
तसेच या अध्ययन भेटीचे आयोजन केल्याबद्दल Maharashtra State Rural Livelihoods Mission यांचे आभार मानण्यात आले.
परिवर्तनात्मक प्रवासाचे सादरीकरण:
संचालक श्री. गणेश पाठारे यांनी संस्थेच्या परिवर्तनात्मक प्रवासावर सविस्तर सादरीकरण केले. यात पायाभूत सुविधा विकास, प्रशिक्षण गुणवत्ता, सेटलमेंट कामगिरी तसेच विविध घटकांशी प्रभावी समन्वय या बाबींचा समावेश होता.
मुक्त संवादातून कल्पनांची देवाणघेवाण:
मुक्त संवाद सत्रात सहभागी अधिकाऱ्यांनी एसबीआय आरसेटी नंदुरबार येथे पाहिलेल्या उल्लेखनीय पद्धती, स्वतःच्या आरसेटींमधील उत्तम उपक्रम आणि पुढील काळात अमलात आणता येणाऱ्या सुधारणा यावर सखोल चर्चा केली. हे सत्र समाधानकेंद्रित ठरले.
जिल्हाधिकारी यांचे प्रेरणादायी मार्गदर्शन:
कार्यक्रमाला मा. जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांचे मार्गदर्शन लाभले. आपल्या प्रेरणादायी भाषणात डॉ. मिताली सेठी यांनी ‘आदर्श’ आरसेटीची संकल्पना,, उद्योजकतेचा खरा अर्थ काय आहे, स्थानिक साधनसंपत्तीपासून गुणवत्तापूर्ण उत्पादने तयार करून त्यांचे प्रभावी विपणन कसे करावे यावर मार्गदर्शन केले.
तसेच ‘आपल्याला सर्व काही माहिती आहे’ अशी भावना टाळून सातत्याने आत्मपरीक्षण करण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली. स्वच्छ, सुरक्षित व आरोग्यदायी उत्पादनांवर आधारित नव्या उद्योगसंधींचा विचार करण्याचे आवाहनही त्यांनी केले.
त्यांच्या मार्गदर्शनामुळे सहभागी अधिकाऱ्यांनी नियमित कामकाजापलीकडे जाऊन नवोपक्रम, स्थानिक संसाधनांचा प्रभावी वापर आणि शाश्वत उद्योजकता विकासाकडे लक्ष देण्याचा संकल्प व्यक्त केला.
ही अध्ययन भेट केवळ निरीक्षणापुरती न राहता, ग्रामीण उद्योजकतेसाठी प्रेरणादायी आणि दिशादर्शक ठरली.
#collectorofficenandurbar#rseti#drmittalisethi
















