(मोड) “एक मूल एक झाड” या कार्यक्रमांतर्गत जिल्हा परिषद शाळा आष्टे येथे वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न झाला. (Tree plantation program completed at Z.P. School Ashte under the “One Child One Tree” programme)
वृक्ष लागवड ही काळाची गरज
कार्यक्रमाच्या प्रारंभी शाळेतील पदोन्नती मुख्याध्यापक कैलास लोहार यांनी पर्यावरण व वृक्षारोपण संदर्भात विद्यार्थ्यांना सखोल माहिती सांगितली. सध्या वातावरणात होणारा बदल त्याचप्रमाणे ऋतुमानातील बदल, वाढते तापमान हे सर्व होणारे बदल वृक्षतोडीमुळे झाले आहेत म्हणून वृक्ष लागवड ही काळाची गरज आहे, असे मनोगत व्यक्त करून शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष घनश्याम वानखेडे यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.
शाळेला क्रीडांगण नसल्याने प्रत्येक विद्यार्थ्यांना म्हणजेच शाळेतील 147 विद्यार्थ्यांना प्रतीके एक वृक्ष देण्यात आला व त्यांना घरी किंवा शेतात लावण्याच्या सूचना करण्यात आली. वृक्षारोपण कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेतील शिक्षक राजू सामुद्रे, संगीता चौधरी, राजेंद्र सूर्यवंशी व दिलीप वळवी यांनी परिश्रम घेतले.