Home महाराष्ट्र केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह यांनी श्री साईबाबा समाधी मंदिराला...

केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह यांनी श्री साईबाबा समाधी मंदिराला भेट देऊन श्री साईबाबांचे व गुरूस्थानचे दर्शन घेतले.

2
Union Home and Cooperation Minister Amit Shah visited the Shri Sai Baba Samadhi Temple and had darshan of Shri Sai Baba and the Gurusthan.

यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही श्री साईबाबा समाधीचे दर्शन घेतले. श्री साईबाबा संस्थानच्यावतीने केंद्रीय मंत्री शाह यांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी जलसंपदा मंत्री (गोदावरी व कृष्णा खोरे विकास महामंडळ) तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, जलसंपदा मंत्री (विदर्भ, तापी व कोकण पाटबंधारे विकास महामंडळ) गिरीश महाजन, पर्यावरण व वातावरणीय बदल मंत्री पंकजा मुंडे, ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे उपस्थित होते.