मुंबई : केंद्रीय गृहमंत्री तसेच सहकार मंत्री अमित शाह यांचे आज रात्री छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर सीमा सुरक्षा दलाच्या विमानाने आगमन झाले.केंद्रीय मंत्री श्री. शाह यांचे स्वागत सांस्कृतिक कार्य मंत्री तथा मुंबई उपनगर पालकमंत्री ॲड.आशिष शेलार, कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा, राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, आमदार रवींद्र चव्हाण, आमदार प्रवीण दरेकर आणि आमदार अमित साटम यांनी पुष्पगुच्छ देऊन केले.यावेळी गृह विभागाचे अपर मुख्य सचिव इकबालसिंह चहल, पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला, मुंबई पोलिस आयुक्त देवेन भारती तसेच राजशिष्टाचार विभाग व पोलीस दलाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
















