Home आरोग्य ग्राम बालविकास समिती (VCDC) — नंदुरबार जिल्ह्यात पोषण सुदृढीकरणाला एक महिना

ग्राम बालविकास समिती (VCDC) — नंदुरबार जिल्ह्यात पोषण सुदृढीकरणाला एक महिना

4
Village Child Development Committee (VCDC) — One month of nutritional strengthening in Nandurbar district

आदिवासी विकास विभागांतर्गत नंदुरबार जिल्ह्यात दिनांक 15 ऑक्टोबर 2025 पासून सुरू झालेल्या ग्राम बालविकास समिती (VCDC) या महत्त्वाकांक्षी उपक्रमाला आज एक महिना पूर्ण झाला आहे. 84 दिवसांचे हे विशेष पोषण-अभियान सध्या जिल्ह्यातील तळोदा, अक्‍कलकुवा, मोलगी, पिंपळखुटा, धडगाव, तोरणमाळ आणि खुंटामोडी प्रकल्पांमध्ये प्रभावीपणे राबविले जात असून, बालकांचे आरोग्य आणि पोषण सुधारण्यासाठी समुदाय-आधारित सामूहिक प्रयत्नांची नवी उंची निर्माण करत आहे. या मोहिमेचा प्रमुख उद्देश गावपातळीवर बालकांचे पोषण, आरोग्य, देखरेख आणि कुटुंबीयांचा सहभाग वाढवून शाश्वत पोषणसुरक्षा निर्माण करणे आहे.

उपक्रमांतर्गत चालू असलेल्या प्रमुख कृती:

ग्राम बालविकास समितीच्या नियमित बैठकीत यंत्रणेतील सर्व घटक अंगणवाडी सेविका, आशा, एएनएम, आरोग्य कर्मचारी, ग्रामप्रतिनिधी सामूहिकपणे बाल आरोग्याचे परीक्षण करत आहेत. त्यात पुढील गोष्टींवर विशेष भर दिला जात आहे,

✔ बालकांची पोषणस्थिती तपासणी:

⦁ वजन, उंची व MUAC द्वारे नियमित परीक्षण

⦁ घरभेटीद्वारे पोषण व आरोग्य सल्ला

✔ EDNF, व्हिटॅमिन A, Albendazole यांसारख्या पोषण संसाधनांचे वितरण

✔ NRC मधून डिस्चार्ज झालेल्या SAM बालकांवर विशेष लक्ष:

⦁ Appetite Test

⦁ ANM/डॉक्टरांकडून वैद्यकीय परीक्षण

⦁ पोषण सल्लामसलत आणि घरभेटीद्वारे सतत पाठपुरावा

Food Journal — वर्तनपरिवर्तनाची नवी दिशा:

Food Journal या नाविन्यपूर्ण साधनामुळे मातांच्या आहारनियोजनात मोठा बदल दिसून येत आहे —

1. माता मुलांच्या चार वेळच्या जेवणाची नोंद नियमित करत आहेत

2. सेविका घरभेटी दरम्यान पुस्तिका तपासत आहेत

3. VCDC बैठकीत सामूहिक आढावा घेतला जात आहे

हा उपक्रम पालकांच्या सक्रिय सहभागासह पोषणविषयक जागरूकता वाढविण्यासाठी अत्यंत परिणामकारक ठरत आहे.

उपक्रमाचे प्रमुख परिणाम:

1. गावांमध्ये बालकांच्या पोषणाबाबत जागरूकता वाढ

2. आरोग्य सेवा देणाऱ्या सर्व घटकांमध्ये उत्कृष्ट समन्वय

3. कुटुंबीयांची पोषणविषयक जबाबदारीत वाढ

4. SAM बालकांसाठी सातत्यपूर्ण व लक्ष्यित फॉलोअप

5. अंगणवाडी व आरोग्य यंत्रणेतील मैदानी पातळीवरील काम सुधारणा

नंदुरबार जिल्ह्यातील प्रत्येक गावात बाल आरोग्य आणि पोषण सुधारण्यासाठी VCDC उपक्रम अत्यंत प्रभावी ठरत आहे. समुदाय सहभाग, शासकीय यंत्रणांची समन्वयित भूमिका आणि नियमित आरोग्य तपासणी यांच्या मदतीने नंदुरबार जिल्हा सुदृढ बालक – सक्षम भविष्य या दिशेने सातत्याने वाटचाल करत आहे.

#Nandurbar#VCDC#ChildNutrition#PoshanAbhiyan