
मा. डॉ. बाबुराव नरवाडे, प्रादेशिक सह आयुक्त, पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय, नाशिक विभाग, नाशिक यांनी नंदुरबार जिल्ह्याचा दौरा करून पशुसंवर्धन विषयक महत्त्वपूर्ण बैठक व प्रत्यक्ष पाहणी केली.
तालुकास्तरीय अधिकाऱ्यांची बैठक – महत्त्वाचे मुद्दे
जिल्हा उपयुक्त पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय कार्यालयात झालेल्या बैठकीत खालील विषयांवर चर्चा व आढावा घेण्यात आला:
1. लंपी रोग प्रतिबंधक उपाययोजना व लसीकरण कार्यक्रम
2. पशुसंवर्धन विभागाला देण्यात आलेल्या कृषी समकक्ष दर्जा विषयक गूगल फॉर्म भरून घेण्याची स्थिती
3. जिल्ह्यातील पशुसंवर्धन विभागाच्या तांत्रिक कामाचा आढावा व विविध वैयक्तिक योजनांची माहिती

नवापूर तालुक्यातील कुक्कुट प्रक्षेत्र मालकांसोबत बैठक:
दौर्यादरम्यान मा. नरवाडे यांनी नवापूर येथे कुक्कुट प्रक्षेत्र मालकांची बैठक घेऊन, पशुसंवर्धन विभागाला मिळालेल्या कृषी समकक्ष दर्जाबाबत सविस्तर माहिती दिली. तसेच भविष्यात या निर्णयामुळे मिळणाऱ्या सवलती आणि लाभांची माहिती पुरवली. सर्व कुक्कुट प्रक्षेत्र मालकांना जैविक सुरक्षा नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले. जिल्हा प्रशासनासोबत सहकार्य करून विभागाच्या उपक्रमांना पाठिंबा देण्याची विनंती केली.
प्रशासनाचा संदेश:
या दौऱ्यामुळे जिल्ह्यातील पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय क्षेत्रातील योजनांची अंमलबजावणी गतीमान होण्यास मदत होईल, तसेच रोगप्रतिबंधक उपाययोजना व तांत्रिक सुधारणांना चालना मिळेल.
#Nandurbar#pashusavardhan#dugdhvyavsay#LumpyRog#poultryfarmingsuccess#KrushiSamkakshDaja#animalhusbandryindia#LivestockDevelopment#kukkutpalan#GraminVikas